ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात असून आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती, मात्र दुसरा दिवस पावसामुळे पूर्णपणे वाहून गेला. आज सेंच्युरियनमध्ये आकाश निरभ्र आहे आणि चांगला सूर्यप्रकाशदेखील आहे. म्हणजेच सामना वेळेवर सुरू होईल. दुसऱ्या दिवसाची भरपाई करण्यासाठी आज एकूण 98 षटके खेळवली जातील. सलामीवीर केएल राहुलच्या शानदार शतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या दिवशी 3 गड्यांच्या बदल्यात 272 धावा केल्या होत्या. आज राहुल आणि अजिंक्य रहाणे भारतीय डाव पुढे नेतील.
दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनला बुमराहने दाखवला तंबूचा रस्ता
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -