Friday, February 23, 2024
Homenewsतिसऱ्या लाटेचा धोका! यल्लमादेवीची यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द, तुमच्या गावातील यात्रेचं...

तिसऱ्या लाटेचा धोका! यल्लमादेवीची यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द, तुमच्या गावातील यात्रेचं काय?

ताजी बातमी ऑनलाईन टीम


पंढरपूर : पंढरपुरातून मोठी बातमी समोर येते आहे. कासेगावची प्रसिद्ध असलेली यल्लमादेवीची यात्रा पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी यल्लमादेवीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी रोखण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्वच यंत्रणांना केलं आहे. या आवाहनाला गंभीरतेनं घेऊन आता यल्लमादेवीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सलग दुसऱ्या वर्षी रद्द
ओमिक्रॉनच्या रुग्णवाढीनं आता गती पकडली आहे. परदेशातील ओमिक्रॉनमुळे आलेली कोरोनी तिसरी लाट हा चिंतेचा विषय बनू लागली आहे. अशातच आता राज्यातही वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळेस जमावबंदी करण्यात आली आहे. वेगवेगळे नियम आता अधिक कठोर केले जात आहेत. अशातच गर्दी रोखण्याचं महत्त्वाचं आव्हान सध्या प्रशासकीय यंत्रणेसमोर आहे. यल्लमादेवीच्या यात्रेनिमित्त असंख्य भाविक दर्शनाला येत असतात. गेल्या वर्षीही यल्लमादेवीची यात्र रद्द करण्यात आली होती. कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा धोका अजूनही टळला नसल्यानं पुन्हा एकदा यल्लमादेवीची कासेगावातील प्रसिद्ध यात्रा रद्द करण्यात आल्याची निर्णय घेण्यात आला आहे.

यल्लमादेवीच्या यात्रेसाठी देशभरातून भाविक हे दर्शनासाठी येत असतात. सध्या महाराष्ट्रासह देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये निर्बंध अधिक कठोरे केले जात आहेत. रात्रीच्या वेळेत करण्यात आलेल्या जमावबंदीच्या निर्णयपासून याची सुरुवात करण्यात आली आहे. अशातच महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर दुसरीकडे वेगवेगळ्या राज्यातून यल्लमादेवीचे भक्त हे दर्शनासाठी येऊन, गर्दी होण्याचीही दाट शक्यता आहे. गेल्यावर्षीही यात्रा न झाल्यामुळे यंदा भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी यात्रेत सहभागी होतील, असाही अंदाज व्यक्त केला जातो आहे. त्यामुळे गर्दी रोखण्यासाठी आणि कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्यांदा यल्लमादेवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, आता वेगवेगळ्या गावांत जत्रा आणि यात्रांचा काळ सुरु होऊ लागलेला आहे. त्यावरही कोरोना संकटाचे ढग ओढावले असून इतर यात्रांबाबत काय निर्णय घेतला जातो, हे पाहणंही महत्त्वाचंय.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -