Tuesday, April 23, 2024
Homeतंत्रज्ञानफेसबुक चॅटचे स्क्रिनशॉट्स घेताय मग सावधान!

फेसबुक चॅटचे स्क्रिनशॉट्स घेताय मग सावधान!

फेसबुक हे संपूर्ण जगात सर्वात जास्त वापरली जाणारी मोठी सोशल नेटवर्किंग साइट आहे. अंतराळाळामध्ये फेसबुक संबंधी काही अपडेट तशाच राहतात. फेसबुकवर चॅट चा स्क्रिन शॉट घेणे धोकादायक ठरू शकते. यामुळे फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने आपल्या युझर्स ना सावध केला आहे. आज आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या फेसबुकवर कधीही करू नका, नाहीतर तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

चॅटचा स्क्रीनशॉट घेणे चुकीचे.
अनेक लोकांना सवय असते की फेसबुक मेसेंजर वर किंवा व्हॉट्सअॅपवर आउट-ऑफ-द-बॉक्स चॅट किंवा काही ठराविक चॅट चा लोक स्क्रिन शॉट्स घेतात. काही वेळा वापरकर्ते तो स्क्रीन शॉट्स व्हायरल करतात. पण आता चॅट चा स्क्रिनशॉट घेतल्यावर समोरच्याला त्याचे नोटिफिकेशन जाऊ शकते त्यामुळे सावध व्हा.

धोनीच्या ‘सुपरहिरो’ अवतारानं सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, (Web Series)

मार्क झुकेरबर्गचा इशारा
या ट्रेंडला आळा घालण्यासाठी फेसबुकने एक नवीन फीचर आणले आहे. मार्क झुकेरबर्ग यांनी स्वतः चॅटचे स्क्रिनशॉट घेतलेल्या युजर्सना चेतावणी दिली आहे.

यूजरला नोटिफिकेशन जाऊ शकते.
आता आम्ही तुम्हाला फेसबुकच्या या फीचरबद्दल सांगणार आहोत. या नवीन फीचर मुळे युजरला स्क्रिनशॉट कोणत्या व्यक्तीने घेतलाय हे देखील समजते. आता व्हॉट्स अॅपप्रमाणे फेसबुकवरसुद्धा एंड-टू-एंड एन्क्रिप्शनची सुविधा उपलब्ध झाली आहे.

काय आहे फेसबुक चे हे नवीन फीचर
फेसबुकच्या या फीचरबद्दल मार्क झुकेरबर्गने सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले की, चॅटचे स्क्रिनशॉट्स काढणे ही सामान्य गोष्ट आहे, पण आजपर्यंत तुमच्या चॅटचे स्क्रीनशॉट्स घेतले जात असल्याचे तुम्हाला माहीत नसेल. आता चॅटचा स्क्रिनशॉट कुणी काढला तर पुढच्या व्यक्तीला फेसबुककडून कळवले जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -