शहरातील सिद्धार्थनगर वसाहतीतील सुरेश सुदाम कांबळे यांच्या घरातून सुमारे 50 लाखांची रोकड अज्ञातांनी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
CIBIL Score For Loan: सिबिल स्कोर नसतानाही मिळणार अर्जंट कर्ज : सरकारकडून गुड न्यूज
दरम्यान, चोरट्यांच्या शोधासाठी पाचारण करण्यात आलेले श्वान केवळ घरातच घुटमळून पोलिस वाहनात जाऊन बसल्याने अधिकारीही चक्रावून गेले आहेत. दरम्यान, फिर्यादी सुरेश कांबळे यांनी पोलिसांना संशयित म्हणून दोघांची नावे दिली होती. त्यापैकी त्यांच्या अगदी जवळच्या नात्यातीलच एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याने चोरी केल्याची कबुली दिली असल्याचे खात्रीशीर समजते आहे. यामुळे चोरीस गेलेली रक्कम पोलिस लवकरच हस्तगत करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
सिद्धार्थनगर वसाहतीत सुरेश व मंगेश कांबळे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सुरेश मजुरी करतात, तर मंगेश नगर परिषद कर्मचारी आहेत. सुरेश यांनी घरातील एका तिजोरीत सुमारे तीस तोळे सोने डब्यात बंद करून ठेवले होते. दुसर्या तिजोरीत तीन डब्यात मिळून सुमारे पन्नास लाख रुपयांची रोकड ठेवली होती. सोमवारी सकाळी सुरेश यांच्या मुलीला शाळेला जाण्यासाठी सॅक हवी होती. ती देण्यासाठी तिजोरी उघडली असता डब्यातील सर्व रक्कम गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिजोरीच्या चाव्या जिथे ठेवतात त्याठिकाणीच चाव्या आढळून आल्या मग रक्कम गेली कशी? असा प्रश्न सुरेश यांना पडला. त्यांनी याबाबतची माहिती हुपरी पोलिसांना दिली असता पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे घटनास्थळी आले. पण घटनास्थळावरील सर्व परिस्थिती पाहून चोरी झाली यावर सुरुवातीला त्यांचा विश्वासच बसला नाही.
मसूद माले (ता. पन्हाळा ) येथे वास्तव्यास असणार्या त्यांच्या बहिणीचे निधन झाल्याने सर्व कुटुंब आठ दिवसांपूर्वी तिकडे गेले होते. त्यादरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी पन्नास लाख रुपये लंपास केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी जवळच्याच एका नातेवाईकांस संशयित म्हणून ताब्यात घेतले असुन त्याच्याकडून या चोरीचा गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता पोलीसांकडून व्यक्त करण्यात 7येत आहे.