मुडशिंगी (ता हातकणंगले) येथे बंद घराच्या व दोन दुकानांच्या दरवाजांच्या कडी कोयंडा अज्ञाताने उचकटून सोन्या – चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ५१ हजार रुपये चोरून नेले असून अन्य चार ठिकाणी सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे चोरीचा प्रयत्न केला असल्याने गावामध्ये खळवळ उडाली असून लोकांतून मितीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची फिर्याद सुनिल श्रीकांत परिट (वय ४२ रा. मुडशिंगी) यांनी हातकणंगले पोलीसांत दिली आहे.
सुनिल परिट यांच्या बंद घराचा व अन्य दोन दुकानांच्या दरवाजाचा कडीकोयंडा व कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये व दुकानात प्रवेश केला व तेथील १ लाख ५ हजार रुपये किंमतीचे १५ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे गंठण, ३५ हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची पिळ्याची एक अंगठी, ४२हजार रुपये ६ ग्रॅम सोन्याची अंगठी एक, २१ हजार रुपये ३ ग्रॅम सोन्याची कर्णफुले दोन, १०हजार५०० रुपये त्यात दौड ग्रॅम वजनाच्या सोनसाखळ्या दोन २१हजार रुपये ३ ग्रॅम कानातील सोन्याचे छुमके, १२०० रुपये अंदाजे ४ भार वजनाच्या चांदीच्या दोन जोडव्या, एक हजार रुपये त्यात अंदाजे ३ भार बजनाचे पैंजण जोड ६ हजार रुपये रोख तसेच सोनाली अशोक खरसे (वय २६ रा. दत्त मंदिराजवळ मुडशिंगी) यांचे स्वामी समर्थ स्टेशनरी दुकानातील रोख रक्कम व गुरुदेव बाबुराव तोडकर (वय ४० रा. ब्रम्हाचा माळ, माले मुडशिंगी) यांचे आराध्या लेडीज वेअर मधील ठेवलेली रोख रक्कम ३५०० रुपये असे एकूण २ लाख ५१ हजार रुपयांची चोरी झाली.