कमी किमतीत फ्लॅगशिप फीचर्ससह Samsung Galaxy S24 5G खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. कारण हा फोन लाँच किमतीपेक्षा 25,000 रुपयांनी स्वस्तात उपलब्ध करण्यात आलेला आहे. AI फीचर्स, तीन कॅमेरे आणि पॉवरफूल बॅटरी व्यतिरिक्त या फोनमध्ये एक पॉवरफूल प्रोसेसर देखील आहे. 25000 रुपयांच्या बंपर डिस्काउंटनंतर तुम्ही हा फोन कोणत्या किंमतीला खरेदी करू शकता ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात.
या फ्लॅगशिप फोनचा 8 जीबी/256 जीबी व्हेरिएंट 79,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता, परंतु आता Amazon वर 31 टक्के सूट मिळाल्यानंतर हा फोन 54,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. याचा अर्थ असा की सध्या तुम्हाला हा फोन लॉन्च किमतीपेक्षा सुमारे 25000 रुपयांनी स्वस्तात मिळेल. स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, या किमतीत सॅमसंग गॅलेक्सी एस24 5जी हा फोन OnePlus 13s 5G, Vivo X200 5G, OnePlus 12 आणि Oppo Reno 14 Pro 5G सारख्या स्मार्टफोन्सना कडक टक्कर देईल.
अमेझॉन ऑफर
फोनवर 25000 रुपयांच्या मोठ्या सवलती व्यतिरिक्त, जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्ही 42,350 रुपयांपर्यंत अतिरिक्त बचत करू शकता. परंतु येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सवलतीची रक्कम तुमच्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल.
सॅमसंग गॅलेक्सी एस24 5जी चे फिचर्स
स्क्रीन: या सॅमसंग मोबाईलमध्ये 6.2 इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो जो 2600 निट्स ब्राइटनेससह येतो.
चिपसेट: या फ्लॅगशिप फोनमध्ये एक्सिनोस 2400 प्रोसेसर आहे.
बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी वायरलेस चार्जिंग आणि 25 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 4000 एमएएचची पॉवरफूल बॅटरी आहे.
कॅमेरा: फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 10 मेगापिक्सेलचा टेलिफोटो सेन्सर आहे. सेल्फीसाठी 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे.
कनेक्टिव्हिटी: कनेक्टिव्हिटीसाठी या 5G फोनमध्ये वाय-फाय 6, ब्लूटूथ व्हर्जन 5.3, यूएसबी टाइप-सी 3.2 पोर्ट आणि एनएफसी सपोर्ट असेल.