Tuesday, September 16, 2025
Homeमहाराष्ट्रआयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत का वाढली? मध्यरात्री अचानक का घेतला फैसला?...

आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत का वाढली? मध्यरात्री अचानक का घेतला फैसला? इनसाईड स्टोरी वाचली का?

जर काल मोठी कसरत करूनही आयकर रिटर्न दाखल झाला नसेल तर काळजी करू नका. करदात्यांना आयकर खात्याने मोठा दिलासा दिला आहे. आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत एक दिवसाने वाढवण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) मूल्यांकन वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न भरण्यासाठी अंतिम मुदत एक दिवसाने वाढवली आहे. 15 सप्टेंबर 2025 ही अंतिम मुदत होती. ती एका दिवसाने वाढवण्यात आली. वर्ष 2025-2026 साठी आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख आज 16 सप्टेंबर 2025 इतकी असेल. सीबीडीटीने रात्री उशीरा याविषयीचा फैसला घेतला. सरकारने मध्यरात्री मुदत वाढ देण्याचा फैसला अचानक का घेतला, असा सवाल विचारण्यात येत आहे.

 

अचानक मध्यरात्री का घेतला निर्णय?

ज्या लोकांनी आतापर्यंत मूल्यांकन वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न दाखल केला नाही. ते आता विना दंड आयकर रिटर्न दाखल करू शकतात. त्यांच्यासाठी एक दिवसाची मुदत वाढ देण्यात आली आहे. मंगळवारी 16 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत आयटीआर दाखल करता येणार आहे. ही अंतिम मुदत अगोदर 15 सप्टेंबर अशी होती. काल अनेक करदात्यांना आयटीआर फाईल करता आला नाही. आयकर विभागाच्या साईटमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यानंतर सरकारने रात्री उशीरा मुदत वाढीचा निर्णय जाहीर केला.

 

करदात्यांकडून तक्रारींचा पाऊस

 

अनेक करदात्यांनी, सनदी लेखपालांनी आयकर रिटर्न भरताना तांत्रिक अडचणीबाबत तक्रार केली होती. वृत्तसंस्था पीटीआयच्या एका वृत्तानुसार, तांत्रिक अडचणींमुळे अनेकांना आयकर रिटर्न भरताना मोठी कसरत करावी लागली. तरीही त्यांना आयकर रिटर्न दाखल करता आला नाही. या तांत्रिक कारणामुळे एक दिवसाची मुदत वाढ देण्यात आली. अनेक करदात्यांनी एक्सवर याविषयीच्या तक्रारी दाखल केल्या. सरकार आणि आयकर विभागाला टॅग करून अनेकांनी ही तारीख वाढवण्याची विनंती केली होती. साईट क्रॅश होत आहे. अपडेट होत नाही आणि इतर अनेक तांत्रिक कारणांची जंत्रीच करदात्यांनी वाचून दाखवली. त्यामुळे मग मध्यरात्री सरकारने मुदवाढ देण्याचा निर्णय घेतला.

 

15 सप्टेंबरपर्यंत 7.3 कोटींहून अधिक आयकर रिटर्न

 

CBDT च्या आकडेवारीनुसार, 15 सप्टेंबर 2025 पर्यंत रेकॉर्डब्रेक 7.30 कोटींहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी हा आकडा 7.28 कोटींपेक्षा अधिक होता. तर कर मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी 31 जुलै, 2024 रोजीपर्यंत 7.28 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते. तर 2023-24 या कर निर्धारण वर्षात 6.77 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते. आकडेवारीवरून प्रत्येक वर्षी आयटीआर दाखल करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -