Tuesday, September 16, 2025
Homeकोल्हापूरपुलाची शिरोली येथील पंचगंगा नदीवरील मध्यभागी असलेला पूल काही दिवस बंद राहणार

पुलाची शिरोली येथील पंचगंगा नदीवरील मध्यभागी असलेला पूल काही दिवस बंद राहणार

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची शिरोली येथील पंचगंगा नदीवरील मध्यभागी असलेला पूल विस्तारीकरणासाठी आणि दुरुस्तीसाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी, या पुलावरील वाहतूक पूर्वेकडील एकाच पुलावरून सुरू ठेवण्यात येणार आहे.

 

याची प्रक्रिया राबविली जात आहे.

 

दरम्यान, पूर्वेकडील पुलावर मध्यभागी दुभाजक ठेवून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोमवारी एकेरी वाहतूक सुरू ठेवून प्रात्यक्षिक घेतले. सध्या तावडे हॉटेल, सांगली फाटा (पुलाची शिरोली), नागाव फाटा व शिरोली एमआयडीसीत पुलाची कामे सुरू असल्याने मुळातच वाहतूक कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत पंचगंगा नदीवरील एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू करणे धोकादायक व वाहन चालकांना त्रासदायक ठरू शकते. याचा परिणाम महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणार आहेत. येणार्‍या काही दिवसांत नवरात्रीमुळे कोल्हापूरला अंबाबाई व जोतिबाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ वाढणार आहे. त्यानंतर दिवाळी सण आहे. याचा विचार करून महामार्ग प्राधिकरणाने पुलावरील वाहतूक तत्काळ बंद करू नये, असे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे.

 

पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन

 

स्थानिक वाहनधारकांनी कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी कसबा बावडा मार्गाचा अवलंब करावा, तर कर्नाटकात जाणार्‍यांसाठी शिवाजी विद्यापीठ मार्गे सरनोबतवाडीकडे जाता येऊ शकते. अशा पर्यायी मार्गांचा अवलंब करून वाहनधारकसुद्धा पंचगंगा नदी पुलावरील वाहतुकीची कोंडी टाळू शकतात, असे महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -