Thursday, November 13, 2025
Homeमहाराष्ट्रभाडेकरूकडून फ्लॅटमालकाची मारहाण करुन हत्या

भाडेकरूकडून फ्लॅटमालकाची मारहाण करुन हत्या

फ्लॅटमालकाची भाडेकरुने मारहाण करुन हत्या केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात घडली. आश्रफ अली मोहम्मद खान असे या 43 वर्षांच्या फ्लॅटमालकाचे नाव असून त्यांच्या हत्येप्रकरणी आरोपी भाडेकरु इम्तियाज हुसैन सय्यद या साठ वर्षांच्या वयोवृद्धाला मालवणी पोलिसांनी

 

बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

शबनम खान ही तिचा पती आश्रफ खानसोबत अंधेरीतील वर्सोवा, सातबंगला, शांतीनिकेतन इमारतीत राहते. त्यांच्या मालकीचे मालाड येथील मालवणीतील म्हाडा, श्री समर्थ सोसायटीत 701 क्रमांकाचा फ्लॅट आहे. याच फ्लॅटमध्ये इम्तियाज हा भाडेकरु म्हणून राहत होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात भाड्याच्या पैशांवरुन वाद सुरू होता. त्यासाठी रविवारी दुपारी आश्रफ खान हे इम्तियाजला भेटण्यासाठी गेले होते. तिथे त्यांच्यात पैशांवरुन बाचाबाची झाली.

 

दोघांमध्ये बाचाबाची होताच रागाच्या भरात इम्तियाजने आश्रफ यांच्या छातीत जोरात लाथ मारली. यामुळे ते बेशुद्ध झाले. यावर आश्रफ यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्यात छातीत गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -