Saturday, September 20, 2025
Homeमहाराष्ट्रकार-दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू

कार-दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू

इस्लामपूर एसटी स्टैंड परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघाताने पेठ परिसर शोकमान झाला आहे. भरधाव चारचाकीने दिलेल्या जोरदार धडकेत पेठ (ता. वाळवा) येथील आकाश चंद्रकांत बाबर (वय २७) जागीच ठार झाला. तर त्याचा मित्र हर्षद बापू सकटे (वय-२१) गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

 

याबाबतची फिर्याद आकाशचा चुलत भाऊ प्रसाद सूर्यकांत बाबर (बब २३) बाने इस्लामपूर पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो. उपनिरीक्षक ताम्हाणे व पो. हे. कॉ. खोत करत आहेत. आकाश व हर्षद हे दोघे इस्लामपूर येथे आले होते. त्यानंतर बुलत भाऊ प्रसादला भेटून मोटारसायकल वरून ते पेठकडे परत निघाले. इस्लामपूर बसस्थानकाजवळ रस्ता ओलांडत असताना अचानक भरधाव मारुती अल्टो ने त्यांना जोराची धडक दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -