पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज मुदतीत भरले नाही. तसेच त्या कर्जापोटी दिलेला धनादेशही वटला नाही. त्यामुळे पतसंस्थेने न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात न्यायालयाने भारती रमेश थरकार या कर्जदार महिलेस सहा महिने तुरुंगवास व १ लाख २० हजार रूपये नुकसान भरपाई पतसंस्थेस देणेबावतचा आदेश दिला आहे.
न
येथील श्री. चौंडेश्वरी महिला नागरी सहकारी पतसंस्थेकडुन भारती रमेश धरकार यांनी कर्ज घेतले होते. सदर कर्जाचे हमे त्यांनी वेळेत भरणा न केल्याने ती थकबाकीदार झाली. पतसंस्थेने तिला लेखी व तोंडी, तसेच समक्ष भेटूर थकित कर्ज परतफेडीची मागणी केली असता तिने पतसंस्थेस तिच्या बँक खात्यावरील धनादेश पतसंस्थेस दिला होता. सदर धनादेश पतसंस्थेने बँकेत भरला असता तो न बटता संस्थेकडे परत आला. त्यानंतर पतसंस्थेने तिच्या विरुध्द येथील न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला होता. सदर दाव्याची सुनावणी होवून सर्व कागदोपत्री पुरावे, उलट तपास आणि पतसंस्थेचे अॅड. जी. पी. कोल्हापुरे व सहकारी वकील अॅड. एस. एस. गुरव यांचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर थकबाकीदार भारती रमेश धरकार यांना सहा महिने साधा तुरुंगवास वरु. १लाख २० हजार रूपये इतकी रकम संस्थेस नुकसान भरपाई म्हणून दयावी असा आदेश इचलकरंजी येथील न्यायालयाने दिलेला आहे.