Saturday, September 20, 2025
Homeमहाराष्ट्रMIDC मध्ये वेश्या व्यवसाय २ तरूणींच्या मदतीनं देहविक्री सुरू

MIDC मध्ये वेश्या व्यवसाय २ तरूणींच्या मदतीनं देहविक्री सुरू

रत्नागिरी जिल्ह्यातील मिरजोळे एमआयडीसी(MIDC) परिसरातून पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा मोठा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात गीता छबी थापा या नेपाळी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. तपासात उघड झाले की, ही महिला पुण्यातील दोन तरुणींच्या मदतीने देहविक्रीचा व्यवसाय चालवत होती.

 

स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय सूत्रांकडून या व्यवसायाची माहिती मिळताच त्यांनी छापा टाकला. पोलिसांच्या कारवाईनंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आले.दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील तुमसर परिसरातील मेहेगाव मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या घरात देहविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर जिल्हा पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत छापा टाकला.

 

या कारवाईत वैभव बोरकर (४०) आणि भरत कोल्हाडकर (३६) या दोघांना अटक करण्यात आली.दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा, १९५६ च्या कलम ३, ४ आणि ५ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.या सलग कारवायांमुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर वेश्याव्यवसाय नेटवर्कवर मोठा आघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे(MIDC).

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -