एप्रिल महिन्यात पहलमाग येथे नृशंस दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागिरक मारले गेले. यानंतर भारातने कठोर भूमिका घेत ऑपरेशन सिंदूर राबवलं. त्याअंतर्गत पीओक आणि पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ लक्ष्य करण्यात आले, या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी ममारले गेले. भारतीय लष्कराने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर, आता पाकमधील दहशतवाद्यांनी भीतीने बोबडी वळली असून त्याच पार्श्वभूमीवर एक मोठी अपडेट समोर आली आहे पाकिस्तानी दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन कडून त्यांचे अड्डे,ठिकाणं बदलण्यात आली आहेत. संरक्षण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संघटना आता त्यांचे तळ पीओकेहून खैबर पख्तूनख्वा येथे हलवत आहेत. पाकिस्तानी सरकारी एजन्सी या प्रयत्नात त्यांना मदत करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यांनंतर आता पीओके सुरक्षित ठिकाण नसल्याचे दहशतवादी संघटनांनी घेतलेल्या या निर्णयावरून दिसून येते असे संरक्षण सूत्रांचे म्हणणे आहे. म्हणूनच, त्यांनी खैबर पख्तूनख्वा येथे आपले तळ हलवण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानशी जवळचे संबंध असल्याने ते ठिकाण अधिक सुरक्षित मानत आहेत.
पाकिस्तानी सरकारी संस्था या प्रयत्नात दहशतवादी संघटनांना मदत करत आहेत, असे एका सूत्राने सांगितले. जैश-ए-मोहम्मदने अलीकडेच अनेक मेळावे आयोजित केले होते. जैशच्या या सर्व मेळाव्यांना पोलिसांचे संरक्षण होते. शिवाय, जमियत उलेमा-ए-इस्लाम (JUI) सारख्या राजकीय-धार्मिक संघटनांनीही या मेळाव्यांमध्ये अप्रत्यक्ष भूमिका बजावली असेही सूत्रांनी सांगितलं. मिळालेली माहिती भारतीय सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांनी संयुक्तपणे तयार केलेल्या दस्तऐवजाचा भाग आहे, असे समजते.
भारतीय सैन्याने अनेक ठिकाणे उद्ध्वस्त केली होती
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याने बहावलपूर, मुरीदके, मुझफ्फराबाद आणि इतर अनेक ठिकाणांसह अनेक दहशतवादी संघटना आणि तळ उद्ध्वस्त केले. अलिकडेच, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या एका वरिष्ठ कमांडरने कबूल केले की ७ मे रोजी भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात संघटनेचा प्रमुख अझहरचे कुटुंबही उद्ध्वस्त झाल्याचे त्याने सांगितले. आता संघटना पुन्हा बांधेल आणि ती आणखी मोठी करेल असा विश्वास लष्कर कमांडरने व्यक्त केला होता.