पहलगाम हल्ल्यानंतर भारताने चारही बाजूंनी पाकिस्तानला घेरले. त्यांच्या घरात घुसून दहशतवादी हल्ले उद्धवस्थ केली तर दुसरीकडे सिंधू जल करार देखील भारताने रद्द करण्याचा निर्णय घेतला. सिंधू नदीतील पाणी पाकिस्तानात जाणार नाहीये. सिंधू नदीच्या पाण्यावर तेथील शेती आणि पिण्याचे पाणी अवलंबून आहे. भारताने आता थेट तेच रोखले. यानंतर पाकिस्तानने मोठा थयथयाट करत तो करार रद्द करू शकत नाही म्हणून अनेक धमक्या दिल्या. मात्र, भारत हा आपल्या भूमिकेवर ठाम आहे. भारताने सिंधू नदीचे पाणी बंद केल्याने पुढच्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तानमध्ये पिण्यासाठी साधे पाणीही मिळणार नाही. आता यादरम्यानच भारताने सिंधू नदीच्या पाण्याबद्दल आता मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मोठी घोषणा केली. पाकिस्तानात सिंधू नदीचे जाणारे पाणी आता दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानकडे वळवले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. सिंधू जल करार पाकिस्तानसोबत रद्द केल्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला. पुढच्या दीड वर्षात हे पाणी दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानकडे वळवले जाईल. मास्टर प्लन तयार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने मोठा निर्णय घेत सिंधू जल करार रद्द केला.
पहलगाम हल्ल्यात 26 भारतीय नागरिकांना पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. 1960 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू नदीच्या पाण्यावरून जल वितरण आणि नियंत्रण करार झाला होता. त्यानुसार भारताकडून पाकिस्तानला पाणी दिले जात होते. मात्र, आता तो करार भारताने रद्द केला आहे. यामुळे हे पाणाी देशातील काही राज्यांकडे वळवले जाईल. याचा मोठा फायदा आता भारतीय नागरिकांना होणार आहे.
राजस्थानमध्ये पाण्याची गंभीर समस्या आहे. सिंधू नदीचे पाणी राजस्थानपर्यंत जाणार आहे. यामुळे तेथील पाण्याचा प्रश्न आता जवळपास सुटण्याच्या स्थितीत आहे. विशेष म्हणजे अवघ्या पुढच्या काही वर्षांमध्ये हे पाणी वळवले जाईल. भारताने पकडलेल्या कोंडीनंतर पाकिस्तान जगातील मुस्लिम देशांसोबत जवळीकता वाढून भारताला कोंडीत पकडण्याचे काम करताना सध्या दिसत आहे.