Tuesday, December 16, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : यड्राव येथे प्रेमसंबंधातून कोयत्याने हल्ला

इचलकरंजी : यड्राव येथे प्रेमसंबंधातून कोयत्याने हल्ला

इचलकरंजी : यड्राव जुन्या वादातून कोयत्याने डोक्यात वार करून एकाला गंभीर केल्याची घटना हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे घडली. सागर रामचंद्र भिसे (वय 25, रा. कोरोची) असे जखमीचे नाव आहे. त्याला उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केले आहे.

 

याप्रकरणी अक्षय मोहन रेनके (वय 28), मंथन मोहन रेनके (26, दोघे रा. कृष्णानगर, शहापूर) यांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याची माहिती तपास अधिकारी सहायक फौजदार सुवर्णा गायकवाड यांनी दिली. फिर्यादी व संशयित एकमेकांचे नातेवाईक आहेत. अक्षयच्या पत्नीचे सागर याच्याशी प्रेमसंबध आहेत. ते दोघे फेब-ुवारी 2025 मध्ये घरातून पळून गेले होते. त्यानंतर ते मे 2025 मध्ये घरी परत आले होते. ते दोघे पळून गेल्याचा राग मनात धरून संशयित अक्षयने सागरला शिवीगाळ करून धमकी दिली होती. सोमवारी रात्री 9 च्या सुमारास रेनके बंधूंनी सागरला शिवीगाळ केली. अक्षयने कोयत्याने डोक्यात मारून गंभीररीत्या जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -