Friday, October 31, 2025
Homeमहाराष्ट्रमराठवाड्यासह विदर्भात चार ते पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा; अस्मानी संकट आणखी...

मराठवाड्यासह विदर्भात चार ते पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा; अस्मानी संकट आणखी गडद होणार, हवामान विभागाचा इशारा

विदर्भात आजपासून पुढील चार ते पाच दिवस सर्वत्र जोरदार पावसाचा (Maharashtra Heavy Rain)अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने आज विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट (Maharashtra Heavy Rain)जारी केला आहे.

 

तर उर्वरित सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमी अधिक प्रमाणात विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस ढगाळी वातावरण राहील आणि तीव्र ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ही होईल असा अंदाज ही हवामान विभागाचा (Maharashtra Heavy Rain) आहे. सोबत 40 ते 50 किमी गतीने वारे ही वाहतील असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम ही विदर्भात होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.(Maharashtra Heavy Rain)

 

मराठवाड्यावरील अस्मानी संकट आणखी गडद होणार(Maharashtra Heavy Rain)

 

त्याचबरोबर मराठवाड्यावरील अस्मानी संकट आणखी गडद होणार आहे. बंगालच्या उपसागरात पुढील २४ तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार, सोबतच, चक्रीय स्थिती असल्याने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.सपुढील ५ दिवसांत राज्यातील सर्वच भागात धुंवाधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही भागात २४ ते २७ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. आजही विदर्भातील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही भागात २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात २७ सप्टेंबर रोजी काही भागात पावसाची तीव्रता अधिक असणार आहे, अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात २५ ते ३० सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. दोन्ही भागात २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर अधिक असणार आहे. मच्छिमारांना २४ ते २९ सप्टेंबर दरम्यान समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

 

बाहेर पडताना काळजी घ्या (Maharashtra Heavy Rain)

 

– राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अंदाजानुसार दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता असून, २६ तारखेपासून कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव अधिक जाणवेल.

– विशेषतः विदर्भ व मराठवाड्यातील पूर्व व दक्षिणेकडील भागांत दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. २७ सप्टेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांत पाऊस वाढू शकतो. यातील काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर २८ तारखेला राज्याच्या पश्चिमेकडील भागांत पावसाचा जोर टिकून राहील, असा अंदाज आहे.

– सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने सायंकाळी बाहेर पडताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -