Friday, October 31, 2025
Homeयोजनाराजस्थानमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कोट्यवधी रुपयांच्या कामांचं भूमीपूजन, पीएम कुसुम योजनेतील...

राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कोट्यवधी रुपयांच्या कामांचं भूमीपूजन, पीएम कुसुम योजनेतील लाभार्थ्यांशीही साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवरात्रीनिमित्त 9 दिवसांचे उपवास आहेत, मात्र तरी देखील त्यांच्या कामाचा वेग थोडा देखील कमी झालेला नाही, 25 सप्टेंबर रोजी गुरुवारी ते विविध कार्यक्रमात सहभागी झाले, विशेष म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह दिसून येत होता, कुठेही थकवा जणावला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दिवसाची सुरुवात आज ग्रेटर नोएडा येथून केली, त्यांच्या हस्ते तिथे उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन 2025 चं उद्घाटन पार पडलं, त्यांनी यावेळी प्रदर्शनाला भेट देत या प्रदर्शनात सहभागी झालेल्या उद्योजकांशी संवाद साधला,त्यांच्या उत्पादनाबाबत माहिती जाणून घेतली.

 

त्यानंतर पंतप्रधान मोदी हे ग्रेटर नोएडा येथून थेट राजस्थानमधील बांसवाडा येथे पोहोचले, बांसवाडामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते तब्बल 12210 कोटींपेक्षाही जास्त किमतीच्या विविध केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रकल्पांचं भूमिपूजन आणि काही प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं. ज्यामध्ये ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि इतर प्रमुख विकास कामांचा समावेश आहे.

 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम-कुसुम योजनेच्या लाभार्थ्यांशी देखील संवाद साधला, या लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थी हे प्रत्यक्ष बांसवाडा इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर काही लाभार्थी हे महाराष्ट्रातून ऑनलाईन पद्धतीनं या कार्यक्रमाशी जोडले गेले. त्यांच्याशी मोदी यांनी संवाद साधला. दरम्यान त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजस्थानमधून दिल्लीला पोहोचले तिथे ते वर्ल्ड फूड इंडिया 2025 या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. त्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या अन्न प्रक्रिया आणि कृषी-व्यवसाय क्षेत्रातील भागधारकांशी संवाद साधाला आणि जागतिक अन्न सुरक्षेत भारताची भूमिका अधोरेखित केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -