Friday, October 31, 2025
Homeमहाराष्ट्रवहिनीसोबत अनैतिक संबंध, तरुणाकडून सख्ख्या भावाची हत्या; डोक्यात दगड घालत घेतला जीव

वहिनीसोबत अनैतिक संबंध, तरुणाकडून सख्ख्या भावाची हत्या; डोक्यात दगड घालत घेतला जीव

पनवेलमध्ये अनैतिक संबंधातून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने आपल्या सख्ख्या भावाची हत्या केली. पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत करंजाडे सेक्टर ७ मध्ये ही घटना घडली.

 

तरुणाने सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे पनवेलमध्ये खळबळ उडाली. ही गंभीर घटना घडल्यानंतर केवळ एका तासाच्या आत पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या बिट मार्शल पथकाने प्रसंगावधान दाखवत आरोपीला ताब्यात घेतले. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी रात्री ८.३७ वाजता ही घटना घडली. डायल ११२ वरून मिळालेल्या माहितीनुसार बिट मार्शल ०५ चे पोलिस अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी तपासादरम्यान आरोपी नागेश (वय २८ वर्षे) हा पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला राहत्या ठिकाणावरून ताब्यात घेतले.

 

प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. मृत दत्तू याचे चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून त्याने रागाच्या भरात डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी दत्तू यांचा मुलगा दिपक याच्या फिर्यादीवरून पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी नागेश काळेला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -