Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रएक जिल्हाधिकारी नृत्यात व्यग्र, तर दुसरीकडे वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर अधिकाऱ्याने पूरग्रस्तांसाठी घेतली धाव

एक जिल्हाधिकारी नृत्यात व्यग्र, तर दुसरीकडे वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर अधिकाऱ्याने पूरग्रस्तांसाठी घेतली धाव

अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत, भागात दाणादाण उडाली असून घरात, शेात, आवारात चहुकडे पावसाचे, पुराचे पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाण्याला खळ नाही. अतिवृष्यीमुळे अतोनात नुकसान झाले असून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य आहे. धाराशिव जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिक पावसामुळे धोक्यात आलेली असतानाच तिथले जिल्हाधिकारी मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करून नाचगाण्यात मग्न असल्याचा संतापजनक प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला होता. त्यावरून बरीच टीकाही झाला, मोठा वाद पेटला होता. मात्र असे असतानाही माणुसकी अजून जिवंत आहे, माणूसपणाचे सहृदयतेचे दर्शन घडवणारे एक उदाहरण त्याच धाराशिवमध्ये समोर आलं आहे.

 

जिल्हाधिकारी कसा नसावा हे गेल्या आठवड्यात दिसलेलं असतानाचा आता, जिल्हाधिकारी कसा असावा, माणुसकी कशाला म्हणतात हे दाखवणारं एक ताजं उदाहरण डोळ्यांसमोर आलं आहे ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष (Mainak Ghosh IAS) यांच्या रुपाने. वडिलांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यसंस्कार आटोपून, ते दु:ख बाजूला ठेवून मैनक घोष हे लगेच दुसऱ्या दिवशी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले. त्यांच्या या कृतीचे , धीरोदत्तपणाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

 

धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा तुळजापूर सांस्कृतिक महोत्सवात डान्स केलेला व्हिडिओ समोर आल्यावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनक घोष यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ड्युटीवर हजर राहून अतिवृष्टी झालेल्या भागात जाऊन त्यांनी आढावा घेतला. त्यामुळे लोकांच्या डोळ्यात अश्रू असतानाही सार्वजनिक कार्यक्रमात जाऊन डान्स करणारे अधिकारी कुठे आणि जन्मदात्या पित्याचे निधन झालेले असतानाही ते दु:ख बाजूला ठेवून दुसऱ्याच दिवशी कर्तव्य बजावणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष कुठे अशी तुलना होऊ लागली असून जिल्ह्यात सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर असलेले मैनक घोष हे मूळचे पश्चिम बंगाले आहे. काही काळापूर्वी त्यांची धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर त्यांची नियुक्ती झाली. त्यांचे वडीलही त्यांचत्यासोबत धाराशिवमध्ये रहात होते. मात्र 27 सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले.

 

वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवून कर्तव्य बजावलं

 

धाराशिवला पुराने वेढा घातला असून दूर-दूरपर्यंत पाण्याचे साम्राज्य दिसत आहे. शेती, घर, दार, सगळं उद्ध्वस्त झआल्याने लोकांच्या डोळ्यात पाणी आहे. अशावेळी मैनक घोष यांनी वडिलांच्या जाण्याचा शोक आवरत, ते दु:ख बाजूला ठेवलं आणि वडिलांचे अंत्यसंस्कार करून दुसऱ्याच दिवशी ते त्यांचं कर्तव्य बजावण्यासाठी ड्युटीवर हजर राहिले. अतिवृष्टी झालेल्या भागात जाऊन त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी योग्य उपाययोजना कशी करता येईल, मदत कशी पोहोचवता येईल याचा आढावा घेत त्यांनी तसे निर्देशही दिले. त्यांच्या या कर्तव्याचे, वृत्तीचे, धीरोदत्तपणाचे कौतुक होत आहे.

 

जिल्हाधिकारी होते नाचण्यात व्यग्र

 

मैनक घोष यांचे आदर्श वर्तन समोर आलेले असतानाच, गेल्याच आठवड्यात त्याच धाराशिवमध्ये नाचगाण्यात व्यस्त असेल्या जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचीह चर्चा झाली नाही तरच नवल. 24 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील नागरिक संकटात असतानाच तुळजापुरातील एका कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी डान्स केला. जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना जिल्हाधिकारी डान्स करत असल्याने नेटकऱ्यांकडून जिल्हाधिकारी जोरदार ट्रोल झाले.

 

एकीकडे डान्स करणारे जिल्हाधिकारी आणि दुसरीकडे पित्याच्या निधनाचे दु:ख पचवत कर्तव्यासाठी पुढे येणारे जिल्हाधिकारी, या दोघांमध्येही तुलना होत असून मैनक घोष यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -