Thursday, October 3, 2024
Homeक्रीडाInd vs SA : शमीचा दुसऱ्याच षटकात द'आफ्रिकेला दणका!

Ind vs SA : शमीचा दुसऱ्याच षटकात द’आफ्रिकेला दणका!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सेंच्युरियनमधील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी टीम इंडिया दुसऱ्या डावात १७४ धावांवर ऑलआऊट झाली. यजमान द. आफ्रिकेसमोर ३०५ धावांचे लक्ष्य आहे. विशेष म्हणजे सेंच्युरियनच्या मैदानावर आजपर्यंत कोणत्याही संघाने २५०+ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केलेला नाही. त्यामुळे विजयासाठी आवश्यक असलेले लक्ष्य द. आफ्रिका गाठेल का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. सध्या द. आफ्रिकेची धावसंख्या १० षटकांत १ बाद २७ असून त्यांना विजयासाठी २७८ धावांची गरज आहे

दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का…

दुस-या षटकाच्या तिस-या चेंडूवर मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिला धक्का दिला. त्याने द. आफ्रिकन संघाची पहिली विकेट पाडली. शमीने एडन मार्करामला बोल्ड केले. आऊट स्विंग खेळण्याच्या नादात मार्कराम प्लेड ऑन झाला. चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन विकेटवर आदळला. मार्करामला एक धाव करता आली. यावेळी द. आफ्रिकेची धावसंख्याही १ च होती

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कवर खेळला जात आहे. आज (दि. २९) सामन्याचा चौथा दिवस आहे. लंचनंतर भारताचा दुसरा डाव ५०.३ षटकांत १७४ धावांत आटोपला. ऋषभ पंतने दुसऱ्या डावात भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३४ धावा केल्या. रबाडा आणि नवोदित मार्को जॅन्सनने प्रत्येकी ४ बळी घेतले. अशा प्रकारे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३०४ धावांची आघाडी घेतली. आता सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला ३०५ धावा करायच्या आहेत.

या शतकात केवळ एकदाच या मैदानावर चौथ्या डावात ३०० हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आला आहे. हा पराक्रम २००१/०२ दक्षिण आफ्रिकेच्या देशांतर्गत हंगामातील सामन्यात झाला. तिसऱ्या डावात १७४ धावांत ऑलआऊट झाल्यानंतर भारतीय संघाने केवळ ४ वेळा कसोटी सामना जिंकला आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसऱ्या डावात भारताची धावसंख्या १ बाद १६ अशी होती. केएल राहुलने ५ आणि नाईटवॉच मॅन शार्दुल ठाकूरने ४ धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारे टीम इंडियाची एकूण आघाडी आता १४६ धावांवर पोहचली होती. तिसऱ्या दिवशी एकूण १८ विकेट पडल्या आणि २६८ धावा झाल्या. भारताचा पहिला डाव १०५.३ षटकात ३२७ धावांवर आटोपला. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात भारताचा डाव १९७ धावांत आटोपला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -