Saturday, July 27, 2024
Homenewsनवीन वर्षात स्वयंपाकाला महागाईची फोडणी? डिजिटल पेमेंटमुळे खिशाला कात्री, नियमांच्या नावाखाली बँकांची...

नवीन वर्षात स्वयंपाकाला महागाईची फोडणी? डिजिटल पेमेंटमुळे खिशाला कात्री, नियमांच्या नावाखाली बँकांची वसुली

ताजी बातमी ऑनलाईन टीम

तुमच्या नव वर्षाच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. नवीन वर्षाच्या स्वागताला दोन दिवस उरले आहेत. नवीन वर्षात तुम्हाला तुमच्या नव योजना आखायच्या आहेत. त्यातच सरकारसह बँकांनी नवीन नियम स्वीकारल्याने तुमच्या ही आर्थिक नियोजनाच्या आराखड्यात बदल करणे आवश्यक झाले आहे. कोरोना काळात सर्वसामान्याची रोजच्या जगण्यासाठी धडपड सुरु आहे. पण या नव्या वर्षात नागरिकांना अधिक धीटाईने घर खर्च भागवावा लागणार आहे.

LPG Cylinder च्या किंमतींचा पुन्हा भडका उडण्याची चिन्हं आहेत. दिवाळीपर्यंत सरकारने एलपीजीच्या किंमती वाढवत आणल्या होत्या. त्यानंतर त्यात भरीव वाढ नोंदविण्यात आली नसली तरी आता त्याला मुहुर्त लागू शकतो. यासोबतच डिजिटल पेमेंटमध्ये बँकांनी नव्याने बदल केल्याने एटीएमवरील निर्धारीत मर्यादेनंतर तुमच्या खिश्यातून व्यवहाराच्या बदल्यात बँका वसुली करणार आहेत.

नवीन वर्ष महागाईचे
चार पाच वर्षांपूर्वी पाचशे रुपयांच्या आत-बाहेर खेळणा-या गॅस दरांना, सरकारने पार हजार रुपयांच्या घरात आणून सोडले आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर दुप्पट भार पडला आहे. दिवाळीपूर्वी झालेल्या निवडणुकांत या रोषाला केंद्र सरकारला बळी पडावे लागले. काही राज्यात केंद्र सरकारविरोधात तीव्र मतदानातून ग्राहकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्याने दिवाळीतील गॅस वाढ टळली. मात्र आता आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचे आयते कारण पुढे करत सरकार 1 जानेवारी 2022 पासून सिलेंडरच्या किंमतीत दरवाढ करण्याची शक्यता आहे. दिल्लीत व्यावसायिक वापराच्या गॅसच्या किंमती 2000 रुपये आहेत. या किंमती पूर्वी 1733 रुपये होत्या. तर मुंबईत 19 किलोंचे गॅस सिलेंडर 1683 रुपयांवरुन 1950 रुपयांना मिळत आहे. कोलकत्यात हाच भाव 2073.50 रुपये तर चेन्नईमध्ये 2133 रुपये आहे. अर्थात उत्तर प्रदेश, पंजाबसह इतर 5 राज्यांतील निवडणुका पाहता गॅस दरवाढ टाळली जाण्याची आणि गॅस स्वस्त करण्याची ही शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -