Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रजग हादरलं! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा खळबळजनक खुलासा, म्हणाले, रशिया फक्त..

जग हादरलं! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा खळबळजनक खुलासा, म्हणाले, रशिया फक्त..

गेल्या साडेतीन वर्षांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. मात्र, जगाला प्रश्न पडला की, इतका मोठा आणि शक्तीशाली देश रशिया युक्रेनचा अजूनही पराभव कसा करू शकला नाही. यावर आता थेट उत्तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिलंय. युक्रेनमागे कोणती ताकद आहे हेच त्यांनी थेट सांगून टाकलंय. रशिया-युक्रेन युद्धाची झळ आता संपूर्ण जगाला बसताना दिसतंय. अमेरिकेने भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने मोठा टॅरिफ लावला. शिवाय काही निर्बंधांच्या धमक्या देखील दिल्या जात आहेत. रशिया काही दिवसात हे युद्ध जिंकेल असे जगाला वाटले. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. आता यावरच बोलताना व्लादिमीर पुतिन हे दिसले आहेत.

 

व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्ट म्हटले की, रशिया हा फक्त युक्रेनसोबतच लढत नाही तर तो संपूर्ण नाटो देशांसोबत लढत आहे. रशिया-युक्रेन युद्धात अमेरिका युक्रेनला मदत करत असल्याचे जगजाहीर आहे. नाटो देश युक्रेनच्या मदतीसाठी मैदानात आहेत. एकटा रशिया या सर्व देशांविरोधात लढत आहे. यादरम्यान भारत आणि चीन या दोन्ही देशांनी रशियाची साथ सोडली नाही. अमेरिकेने भारताला थेट म्हटले की, तुम्ही रशियाकडून तेल खरेदी बंद करा आम्ही तुमच्यावरील 25 टक्केट टॅरिफ काढू.

 

फक्त टॅरिफच नाही तर वेगवेगळ्या धमक्या अमेरिका भारताला देत आहे. पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा देत म्हटले की, जर तुम्ही युक्रेनला लांबची मिसाईल देणार आहात तर हे खूप म्हणजे खूप जास्त वाईट होईल आणि परिस्थिती अधिकच खराब होणार हे नक्की आहे. जर अमेरिकेने युक्रेनला मिसाईल दिली तर त्यामुळे रशियाचे मोठे नुकसान होईल. मात्र, तसे असले तरीही रशियाची वायु सुरक्षा या नवीन धोक्यासाठी देखील तयार आहे.

 

रशियाला पेपर टायगर म्हटले जातंय. मात्र, रशियाला गेल्या काही दिवसांपासून एकटाच पूर्ण नाटो समुहाला पुरून उरला असल्याचे पुतिन यांनी म्हटले. आता पुतिन यांनी स्पष्ट केले की, रशिया हा फक्त युक्रेनसोबत युद्ध करत नाही तर संपूर्ण नाटो देशांसोबत युद्ध करत आहे. नाटो देश एकट्या रशियाच्याविरोधात मैदानात उतरली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -