Thursday, October 9, 2025
Homeजरा हटकेआणखी एका केससाठी तयार राहा..; पूर्व पत्नीवरून टिप्पणी करणाऱ्याला चहलचं सडेतोड उत्तर

आणखी एका केससाठी तयार राहा..; पूर्व पत्नीवरून टिप्पणी करणाऱ्याला चहलचं सडेतोड उत्तर

स्टँडअप कॉमेडियन समय रैना नुकताच एका मेकअप ब्रँडच्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची कथित गर्लफ्रेंड आरजे महवशसोबत दिसला. यावेळी समयने चहलची पूर्व पत्नी धनश्री वर्माचं नाव न घेता त्यावरून बरीच फटकेबाजी केली. परंतु चाहत्यांना हे क्षणार्धात समजलं होतं की त्याने हे सर्व टोमणे धनश्री आणि चहलला मारले आहेत. त्यावर आता चहलची प्रतिक्रिया समोर आली असून त्याने समयला सडेतोड उत्तर दिलं आहे.

 

या व्हिडीओमध्ये समयने आधी आरजे महवशला तिचं आवडतं अल्फाबेट (इंग्रजीतील अक्षर) विचारलं. त्यावर तिने ‘M’ (एम) असं उत्तर दिलं. कारण त्याच्या नावाची सुरुवात ‘एम’ने होते, असं तिने म्हटलं. त्यानंतर समय तिला चिडवत म्हणतो, “मला तर दोन अक्षरं खूप आवडतात. U (यू) आणि G (जी). अवघ्या दोन महिन्यांतच त्याचा ‘राइज अँड फॉल’ झाला होता.” समयने हे टोमणे युजवेंद्र आणि धनश्रीच्या नात्यावरून लगावले होते. कारण धनश्रीने दोन महिन्यांतच नात्यात फसवणूक झाल्याचा आरोप केला होता. हे सर्व करताना समयने तसाच टी-शर्ट घातला होता, जसा चहलने घटस्फोटाच्या सुनावणीदरम्यान घातला होता.

 

आता समय रैनाने एका व्हिडीओ कॉलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये युजवेंद्र चहल दिसून येत आहे. चहल डोक्यावर हात लावून हसताना दिसतोय. ‘लव्ह यू माय शुगर डॅडी’ असं तिथे लिहिलेलं आहे. हेच रिपोस्ट करत चहलने समय रैनाला थेट इशारा दिला. ‘आणखा एका केससाठी तयार राहा..’ असं लिहित त्यासोबत हसण्याचा इमोजी पोस्ट केला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘हे फक्त समयच करू शकतो’, असं एकाने लिहिलं. तर ‘हे जरी स्क्रिप्टेड असलं तरी भन्नाट आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

 

क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि डान्सर धनश्री वर्मा यांनी 2020 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या पाच वर्षांतच दोघं विभक्त झाले. या दोघांनी घटस्फोटाचा निर्णय का घेतला, याबाबत त्यांनी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. 2025 या वर्षाच्या सुरुवातीलाच दोघं एकमेकांपासून विभक्त झाले. यादरम्यान चहलच्या एका टी-शर्टने नेटकऱ्यांचं विशेष वेधलं होतं. ‘Be Your Own Sugar Daddy’ असा मजकूर त्यावर लिहिला होता. त्यावरून धनश्रीने केवळ पैशांसाठी चहलशी लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -