Monday, November 24, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : दुचाकीच्या धडकेत सहा.फौजदार जखमी

इचलकरंजी : दुचाकीच्या धडकेत सहा.फौजदार जखमी

बेदरकारपणे दुचाकी चालवून महिला सहा. फौजदार सुवर्णा सागर गायकवाड यांना जखमी केले. या प्रकरणी विकास तुकाराम माने (वय ३५ रा. कोरोची) याच्याविरूध्द शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा अपघात कोरोची येथील हॉटेल निलतारासमोर शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला.

 

विकास माने हा आपल्याकडील दुचाकी घेऊन भरधाव वेगाने जात होता. तेव्हा कोरोची येथील हॉटेल निलतारासमोर त्याने महीला सहा. फौजदार सुवर्णा सागर गायकवाड यांना जोराची धडक दिली. यामध्ये गायकवाड या जखमी झाल्या तसेच दुचाकीस्वारही जखमी झाला. याबाबत गणेश लोहार यांनी फिर्याद दिली असून विकास माने याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -