रेंदाळ येथील शुभम परशराम गवळी (वय २८, रा. भगतसिंग रोड, त्रिमूर्ती चौक) हा युवक २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजल्यापासून घरात कोणालाही न सांगता बेपत्ता झाला आहे.
त्याच्या कुटुंबियांनी शोध घेऊनही तो अद्याप मिळून आला नाही.
शुभमचा रंग गोरा असून उंची सुमारे ५ फूट
आहेत. ४ इंच आहे. त्याची मानसिक स्थिती चांगली असून तो मराठी बोलतो. तो बेपत्ता झाला तेव्हा त्याने पांढऱ्या काळ्या रंगाचा टीशर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केली होती. त्याच्या उजव्या हातावर कड्याप्रमाणे टॅटू गोंदलेले असून पायात चॉकलेटी रंगाचे चप्पल
याबाबतची नोंद त्याचे वडील परशराम बापू गवळी यांनी हुपरी पोलिसांत दिली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. शुभम गवळीबद्दल काही माहिती मिळाल्यास त्वरित हुपरी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे








