गुटख्याची बेकायदा वाहतूक करणार्या बिंदू चौक परिसरातील भोई गल्ली येथील जावेद मलिक बागवान (वय 38) यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सोमवारी अटक केली. संशयिताकडून 2 लाख 74 हजारांचा गुटखा व मोटार असा 10 लाख 74 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील सहायक निरीक्षक सागर वाघ याच्या पथकाने रविवारी रात्री उशिरा बिंदू चौक, भोई गल्ली परिसरात ही कारवाई केली. संशयिताकडून मोटार कार हस्तगत करण्यात आली आहे. संशयित बागवान हा गुटख्याची तस्करी करीत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने सापळा रचून कारवाई केली. संशयिताविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




