भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून 19 ऑक्टोबरपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर टी20 मालिका होणार आहे. भारताच्या वनडे मालिकेची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर आहे. तर टी20 संघाची धुरा सूर्यकुमार यादव याच्याकडे असणार आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाने दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका आणि टी20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियाने वनडे मालिकेसाठी 15 खेळाडूंची घोषणा केली आहे. तर टी20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी 14 सदस्यांची निवड केली आहे. ऑस्ट्रेलिया दक्षिण अफ्रिकेविरुद्ध शेवटचं व्हाईट बॉल क्रिकेट खेळली होती. या संघातून पाच खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. वनडे संघातून 3 खेळाडू बाहेर गेले आहेत. यात आरोन हार्डी, मॅथ्यू कुन्हेमन आणि मार्नस लाबुशेन यांची नावं आहेत. तर 4 जणांची निवड वनडे संघात झाली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघात 11 महिन्यानंतर मिचेल स्टार्कची एन्ट्री झाली आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पहिल्यांदाच व्हाइट बॉल क्रिकेट खेळणार आहे. स्टार्कशिवाय वनडे संघात मॅट रेनशॉ यालाही स्थान मिळालं आहे. रेनशॉने अजूनही वनडे सामन्यात डेब्यू केलं नाही. पण भारताविरूद्धच्या मालिकेत पदार्पणाची संधी मिळू शकते.
ऑस्ट्रेलियाचा वनडे संघ : मिचेल मार्श ( कर्णधार), झेव्हियर बार्टलेट, एलेक्स कॅरी, कूपर कोनोली, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, बेन ड्वारशुइस, ट्रेविस हेड, मिचेल ओवन, जोश इंग्लिस, मॅट रेनशॉ, मैथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, एडम झम्पा.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने टी20 वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून आता तयारी सुरु केली आहे. त्यापूर्वी भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेत लिटमस टेस्ट होणार आहे. या दृष्टीकोनातून ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन सामन्यांसाठी टी20 संघ निवडला आहे. एलेक्स कॅरी आणि जोश फिलिप्स यांना टी20 संघात जागा मिळाली नाही. तर नाथन एलिस आणि जोश इंग्लिस यांना संघात स्थान मिळालं आहे.
पहिल्या दोन टी20 सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ : मिचेल मार्श ( कर्णधार), शॉन एबट, झेव्हियर बार्टलेट, टिम डेविड, नाथन एलिस, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुन्हेमन, मिचेल ओवन, बेन ड्वारशुइस, मैथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, एडम झम्पा.
