गुंतवणूकदारांना सोन्यावाणी कमाई करता येईल. चेनईस्थित ललित ज्वेलरी मार्ट यांना भांडवली बाजार नियामक सेबी कडून 1700 कोटींच्या IPO (प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री) साठी अंतिम मंजुरी मिळाली आहे. कंपनीने 6 जून 2025 रोजी सेबीकडे IPO चे दस्तावेज सादर केले होते. हा IPO दोन भागांमध्ये विभागलेला असेल. 1200 कोटींचे नवीन इक्विटी शेअर्स इश्यू होतील. तर प्रोमोटर्स किरणकुमार जैन यांच्याकडून 500 कोटींची ऑफर-फॉर-सेल असेल. या IPO द्वारे जी रक्कम जमा होईल. त्यातील1014.50 कोटी नवीन ज्वेलरी मार्ट स्थापन करण्यासाठी आणि इतर सामान्य कॉर्पोरेट गरजांसाठी वापरण्यात येणार आहेत.
ललिता हा चेन्नई येथील ज्वेलरी ब्रँड आहे. त्याची स्थापना 1985 साली टी.नगर भागात झाली. तिथे पहिले दागिन्यांचे दुकान सुरू झाले. हा ज्वेलरी ब्रँड सोन्याचे दागिने, त्यासोबत चांदी, हिऱ्यांचे दागिन्यांची विक्री करतो. भारतातील विविध शहरांमध्ये एकूण 56 स्टोअर्स आहेत. त्यातील आंध्र प्रदेशमध्ये 22, तमिळनाडूत 20, कर्नाटकमध्ये 7, तेलंगणामध्ये 6, पुद्दुचेरीत 1 दुकान आहे. या दुकानांचे एकूण क्षेत्रफळ – 6,09,408 चौरस फूट तर 47 स्टोअर्स 5,000 चौरस फूटांपेक्षा अधिक क्षेत्रफळाचे आहेत.
कंपनीची आर्थिक कामगिरी
ललिता ज्वेलरी मार्टची आर्थिक वर्ष 2024 मधील एकूण उत्पन्न 16,788.05 कोटी रुपये होते. तर आर्थिक वर्ष 23 मध्ये 13,316.80 कोटी रुपये होते. म्हणजे उत्पन्नात 26.07% वाढ झाली आहे. कंपनीला या काळात 359.8 कोटींचे तर मागील आर्थिक वर्षात 238.3 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. तर गेल्या 31 डिसेंबर 2024 पर्यंत कंपनीचे उत्पन्न 12,594.67 कोटी रुपये आणि नफा 262.33 कोटी रुपये इतका झाला होता. आता कंपनी आयपीओ बाजारात आणणार आहे. त्यामाध्यमातून 1700 कोटी रुपयांचे भांडवल बाजारातून उभारल्या जाणार आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओतून कमाई करण्याची संधी आहे.
ललिता ज्वेलरी योजना
‘धन वंदनम’ आणि ‘फ्री-यो-फ्लेक्सी’ या योजनांमध्ये 4,20,261 इतके सक्रिय ग्राहक आहेत. तिरुमुदिवाक्कम, चेन्नई,माऱामलै, कांचीपुरम येथे कंपनीच्या मालकीची भव्य मार्ट आहेत. यामध्ये 563 कारागीर असून त्यापैकी 474 कंपनीकडून, 89 सहाय्यक कंपनीकडून काम करतात. भारतातील सर्वात मोठ्या दागिने स्टोअरपैकी एक विजयवाडा (1,00,000 चौरस फूट) येथे आहे. सोमाजिगुडा आणि विशाखापट्टणम मधील मोठ्या स्वरूपातील स्टोअर्स अनुक्रमे 98,210 आणि 65,000 चौरस फूट परिसरात विस्तारलेली आहेत.
