Monday, November 24, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी:तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा आठजणांना अटकः अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी:तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा आठजणांना अटकः अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

तीन पानी जुगार खेळणाऱ्या आठजणांना अटक करण्यात आली. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यांच्याकडून २ लाख ५८ हजार ३९० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई सोमवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली.

 

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, बंडगर माळ येथील प्रविण बेलेकर यांच्या खोलीत जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी धाड टाकून आकाश अनिल घड्डे (वय ३६, रा. गोकुळ चौक), राजूबाबा रंगनाथ केसरवाणी (वय ४०रा. पुजारी मळा), प्रविण बळवंत बेलेकर (वय ४२,रा. स्वामी मळा), मोहन बाळू कोळी (वय२९, रा. बंडगर मळा), धीरज पंडीत गुरव (वय ३२, रा. बंडगर माळ), राहूल धनराज निसाद (वय २७, रा. नारळ चौक), मंथन विश्वनाथ खबरे (वय १९, रा. बंडगर माळ), अशितोष चंद्रकांत शिंदे (वय २७, रा. संग्राम चौक) या आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पो.कॉ. विकास | चौगुले यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -