स्टार क्रिकेटर वैभव सूर्यवंशी हा सध्या ऑस्टेलिया दाैऱ्यावर असून तो युवा कसोटी मालिका खेळतोय. टीम इंडिया या मालिकेतील दुसरा सामना खेळतंय. धमाकेदार गेम खेळताना वैभव दिसला. मालिकेतील पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने शतक करून सर्वांची मने जिंकली. यामधील सर्वात विशेष बाब म्हणजे त्याने जलद धावा करून मोठा इतिहास रचला. राजस्थान रॉयल्सचे हाय परफॉर्मन्स संचालक झुबिन भरुचा यांचे मत आहे की, वैभव सूर्यवंशी याचा लवकर वरिष्ठ संघात समावेश करावा. यादरम्यान त्यांनी थेट सचिन तेंडुलकर याचे उदाहरण देखील दिले. वरिष्ठ संघात निवड होण्याच्या अगोदर आता वैभव सूर्यवंशीच्या अडचणीत वाढ झाल्याचे बघायला मिळतंय.
10 ऑक्टोंबरला कसोटी सामने संपतील आणि वैभव सूर्यवंशी हा भारतात परतेल. मात्र, भारतात येताच त्याला मोठ्या चाैकशीचा सामना करावा लागेल. टीम इंडियाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक आणि राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी नुकताच वैभवला मोठा इशारा दिला. हेच नाही तर त्यांनी स्पष्ट म्हटले की, भारतात परत आल्यावर तुझी चाचणी केली जाईल. विक्रम राठोड यांनी वैभवला फोन केला आणि काही गोष्टी थेट विचारल्या.
विक्रम राठोड यांनी वैभव सूर्यवंशीला फोन करून म्हटले की, तुझा फिटनेस कसा आहे? यावर उत्तर देत वैभवने म्हटले, फिटनेस मस्त आहे. मात्र, वैभवचे बोलणे त्यांना फार काही पटले नाही. त्यांनी थेट इशारा देत त्याला म्हटले की, तू परत ये… आपण बघूयात. विक्रम राठोड यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट होतंय की, तो परत आल्यानंतर त्याची चाैकशी केली जाणार आहे.
वैभव सूर्यवंशी याला आयपीएलमधून खास ओळख मिळाली आहे. राजस्थान रॉयल्स संघाकडून तो आयपीएल खेळतो. 2025 च्या हंगामात, त्याने राजस्थान रॉयल्ससाठी षटकार मारून आपले खाते उघडले. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने फक्त 34 चेंडूत शतक केले. आता वैभवचा भारतीय संघात समावेश व्हावा, याकरिता राजस्थान रॉयल्स संघाकडून प्रयत्न केली जात आहेत. यासोबतच राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षक विक्रम राठोड वैभवच्य फिटनेससाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.