पुणे शहरातील पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन (Pune News) आगारात हनीट्रॅपची एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिला कंडक्टरने पैशांसाठी तीन कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध ठेवून त्यांची फसवणूक केली आहे.
महिला कंडक्टर वारंवार तिघांना धमक्या देऊन त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू उकळत होती.
गेल्या काही वर्षांत पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विविध प्रकारच्या फसवणुकींच्या घटना घडत असतांना याच पार्श्वभूमीवर ही हनीट्रॅपची घटना अधिकच चिंताजनक ठरली आहे.
17 सप्टेंबर रोजी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात महिला कंडक्टरविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिस तपासात समोर आले की, आरोपीने पीडितांकडून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू मिळवण्यासाठी बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले. त्याचबरोबर, महिलेने पीडित व्यक्तींविरोधात खोट्या तक्रारी दाखल केल्याचे उघड झाले आहे. पोलिस आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
या प्रकरणी अखेर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. पीएमपी महामंडळ प्रशासनाने हनीट्रॅप प्रकरणी संबंधित महिलेला निलंबित केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सर्व संबंधितांचा तपास करून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.