क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे या ना त्या कारणाने चर्चेत असतात. गेल्या काही वर्षात या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचा बातम्या येत होत्या. त्यानंतर या दोघांचा घटस्फोटही झाला. घटस्फोटाच्या तडजोडीत धनश्रीला सुमारे 4.75 कोटी रुपयांची पोटगी मिळाल्याचं चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.मात्र वाद काही संपताना दिसत नाही. आता या वादाला धनश्रीने केलेल्या आरोपांची किनार लाभली आहे. धनश्री वर्मा राईज अँड फॉल या रिएलिटी शोमध्ये स्पर्धक आहे. यावेळी तिने कुब्रा सैतशी झालेल्या संभाषणात खळबळजनक दावा केला. यामुळे क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं. लग्नाच्या दोन महिन्यानंततरच तिला चहलने फसवणूक केल्याचं लक्षात आल्याचं सांगितलं. त्यामुळे या दोघांच्या नात्यात पहिल्या दोन महिन्यातच वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. आता युजवेंद्र चहलने या आरोपांचं खंडन करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना युजवेंद्र चहलने धनश्रीने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
युजवेंद्र चहल म्हणाला की, ‘”मी एक खेळाडू आहे आणि मी फसवणूक करत नाही. जर कोणी दोन महिन्यातच फसवणूक केली असतीत तर इतकं लांब नातं टिकलं असतं का? माझ्यासाठी, हा विषय संपला आहे, पूर्ण झाला आहे आणि डब्यात गेला आहे. मी माझ्या आयुष्यात पुढे गेलो आहे आणि इतरांनीही असेच केले पाहिजे.” युजवेंद्रने या वक्तव्यातून धनश्रीने केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगितलं आहे. इतकंच काय आयुष्यात पुढचा मार्ग स्वीकारला असून झालं ते विसरून गेल्याचं देखील अधोरेखित केलं आहे.
युजवेंद्र चहल स्पष्ट म्हणाला की, “आमचं लग्न साडेचार वर्षे टिकलं. जर मी दोन महिन्यातच फसवणूक केली असती तर कोणी येथपर्यंत टिकवलं असतं का? मी आधीही स्पष्ट केलं आहे. मी आता पुढे निघून गेलो आहे. पण काही लोकं अजून तिथेच अडकली आहेत. त्यांचं घर जर माझ्या नावाने चालत असेल तर त्यांना तसं करू देत. मला याची चिंता नाही.” इतकंच काय तर युजवेंद्र चहल पुढे म्हणाला की, ‘कोणी काहीही सांगत आणि ते सोशल मीडियावर चाललं. 100 गोष्टी येतात. पण सत्य फक्त एकच असतं. महत्त्वाचं का यते माहित आहे. माझ्यासाठी अध्याय संपलाय. मी यावर पुन्हा कधीही बोलू इच्छित नाही.’




