Friday, October 17, 2025
Homeमहाराष्ट्रविषारी कफ सिरपमुळे मृत्यू तांडव! उपचारादरम्यान आणखी एका चिमुकल्याचा मृत्यू; मृतांची संख्या...

विषारी कफ सिरपमुळे मृत्यू तांडव! उपचारादरम्यान आणखी एका चिमुकल्याचा मृत्यू; मृतांची संख्या 17वर

विषारी कफ सिरपमुळे साद्याप देशभरात चिमुकल्यांचे मृत्यू तांडव सुरु असल्याचे चित्र आहे. अशातच मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) परासिया तालुक्यातील 1 वर्षीय बालकाचा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू (Cough Syrup Death Case) झाला आहे. 1 ऑक्टोबर रोजी हा बालक नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. तेव्हापासून त्याची प्रकृती अत्यवस्थ होती. गेले काही दिवस तो सातत्याने व्हेंटिलेटरवर होता.

 

अशातच, गुरुवारी दुपारीच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात येऊन या बालकाची प्रकृतीची विचारणा केली होती. तेव्हाच डॉक्टरांनी तो अत्यवस्थ (क्रिटिकल) असल्याची माहिती दिली होती. दरम्यान, संध्याकाळी त्या बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे भेसळयुक्त कफ सिरफमुळे नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या मध्य प्रदेशातील बालकांची संख्या आता 17 झाली आहे.

 

विषारी कफ सिरपची WHO कडून दखल, भारताला तातडीने स्पष्टीकरण मागवले! WHOCough Syrup Death Case)

दुसरीकडे, विषारी कफ सिरपमुळे राजस्थान आणि मध्य प्रदेशात झालेल्या 29 मुलांच्या मृत्यूची WHO ने गंभीर दखल घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या घटनेबद्दल तसेच कफ सिरपच्या सुरक्षिततेबद्दल भारताला ईमेलद्वारे स्पष्टीकरण मागितले आहे. स्थानिक कफ सिरपबद्दल WHO ने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, भारताने दूषित बॅचेसची निर्यात केली नसली तरी, रेकॉर्ड न केलेल्या शिपमेंटची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. कच्च्या मालात आणि तयार उत्पादनांमध्ये डायथिलीन ग्लायकोल (DEG) आणि इथिलीन ग्लायकोल (EG) ची कडक तपासणी करण्याची गरज एजन्सीने अधोरेखित केली. भारतीय कायद्यानुसार, औषध कंपन्यांना कच्च्या मालाच्या आणि अंतिम उत्पादनांच्या प्रत्येक बॅचची चाचणी करणे आवश्यक आहे. या प्रकरणांमध्ये नियमांचे उल्लंघन केले गेले आहे असे दिसते. असे हो WHO चे म्हणणे आहे.

 

घाबरून जाऊ नका, काय काळजी घ्याल? (Madhya Pradesh Cough Syrup)

तज्ञ सांगतात, खोकला आला तरी घाबरून जाण्याची गरज नाही. तो 5 ते 7 दिवसांत स्वतःहून बरा होऊ शकतो, फक्त तुमच्या मुलाला थंडीपासून दूर ठेवा.

 

तीव्र खोकल्यासाठी हनीटोस कफ सिरप आणि तापासाठी पॅरासिटामॉल लिहून दिले जाते. म्हणून, बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.

 

खोकल्याचे दोन प्रकार आहेत: कोरडा खोकला आणि ओला खोकला. दोन्हीसाठी वेगवेगळी औषधे आणि उपचार आहेत. जर खोकला दम्यासारख्या वायुमार्गातील अडथळ्यामुळे होत असेल तर खोकला दाबण्याऐवजी, अडथळा दूर करण्यासाठी काम केले पाहिजे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -