डिजिटल युगात UPI पेमेंट अगदी सोप्पे झाले आहे. भाजीबाजारापासून शेअर मार्केटपर्यंत सर्व आर्थिक व्यवहार आता UPIद्वारे होत आहेत, पण अनेकदा आपल्याला बँक खात्यात शिल्लक नसल्याची जाणीव नसेल, ज्यामुळे पेमेंट करताना अडचण येते. मात्र आता भीम यूपीआयने आणलेलं खास फीचर यावर उपाय ठरलं आहे.UPI सर्कल’ या नवीन सुविधेमुळे, तुमच्या बँक खात्यात १ रुपयाही नसतानाही तुम्ही पेमेंट करू शकता. हे फीचर तुम्हाला विश्वासू मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांना तुमच्या खात्यातून पैसे पाठवण्याची परवानगी देते(transactions).
पेमेंट मर्यादा: तुम्ही समोरच्या व्यक्तीस किती रुपयांपर्यंत पैसे वापरण्याची मर्यादा ठरवू शकता.
मंजुरीचा पर्याय: प्रत्येक व्यवहारासाठी तुमची मंजुरी आवश्यक आहे का, हे ठरवता येते. एकदा मंजुरी दिली की, विश्वासू मित्र त्याच्या UPI ॲपमधून पेमेंट करू शकतो.
‘UPI सर्कल’ सक्रिय करण्याची सोपी प्रक्रिया
ॲप उघडा: मोबाईलमध्ये BHIM ॲप उघडा.
लॉगिन: नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरून लॉगिन करा.
फीचर शोधा: होम स्क्रीनवर ‘UPI सर्कल’ क्लिक करा.
सदस्य जोडा: ज्यांना पेमेंटची परवानगी द्यायची आहे, त्यांना ॲड करा (फोन नंबर, UPI ID किंवा QR कोड वापरून).
मर्यादा सेट करा: किती रुपये वापरले जाऊ शकतात, ठरवा.