Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रफ्लिपकार्टचे बिग बँग दिवाळी सेल, स्मार्ट टीव्ही आणि वॉशिंग मशीनवर मोठी सूट

फ्लिपकार्टचे बिग बँग दिवाळी सेल, स्मार्ट टीव्ही आणि वॉशिंग मशीनवर मोठी सूट

तुम्ही जर दिवाळीपूर्वी स्मार्ट टीव्ही आणि वॉशिंग मशीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. फ्लिपकार्ट सध्या दिवाळी सेल आयोजित करत आहे आणि या सेल दरम्यान थॉमसन कंपनीने त्यांच्या प्रोडक्टवर मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. या सेल दरम्यान तुम्ही 5,999 रूपयांमध्ये स्मार्ट टीव्ही आणि 4,590 रूपयांमध्ये नवीन वॉशिंग मशीन खरेदी करू शकता.

 

स्मार्ट टीव्हीवर आकर्षक ऑफर्स

या दिवाळी सेलमध्ये थॉमसन कंपनीचे स्मार्ट टीव्ही आकर्षक किमतीत उपलब्ध केले आहेत. याव्यतिरिक्त तुम्ही कंपनीने त्यांचे नवीन मिनी क्यूडी एलईडी टीव्ही आणि जिओ टेली ओएस टीव्ही लाँच केले आहेत, ज्यात क्वांटम डॉट तंत्रज्ञान आणि मिनी एलईडी बॅकलाइटिंग आहे. या टीव्हीमध्ये स्मार्ट आय शील्ड, डायनॅमिक बॅकलाइट टेक्नॉलॉजी आणि गुगल टीव्ही सारख्या प्रभावी फिचर्सचा समावेश आहे.

 

एकूणच, त्यांची किंमत 5,999 पासून सुरू होते आणि 4K डिस्प्ले, डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि डॉल्बी डिजिटल प्लस सारखी फिचर्स देण्यात आली आहेत. तर यामध्ये टीव्ही गेमिंग, बिंज-वॉचिंग पाहण्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत.

 

मिनी एलईडी आणि क्यूएलईडी टेक्नॉलॉजीसह नवीन टीव्ही

थॉमसनने मिनी एलईडी आणि क्यूडी एलईडी टीव्हीची विक्री देखील जाहीर केली आहे. या टीव्हीमध्ये 540 लोकल डिमिंग झोन आणि 108 वॅट साउंड सिस्टम सारखी फिचर्स आहेत. या स्मार्ट टीव्हीमध्ये गुगल टीव्ही सपोर्ट, एचडीआर10+, डॉल्बी ऑडिओ आणि TruSurround देखील आहेत. याव्यतिरिक्त, हे टीव्ही 2 जीबी रॅम, 16जीबी रॉम आणि ड्युअल-बँड वाय-फायसह येतात.

 

वॉशिंग मशीनवर उत्तम डील

या सेल दरम्यान थॉमसन वॉशिंग मशीन देखील मोठ्या सवलतीत खरेदी करता येतील. त्यामध्ये 5-स्टार बीईई रेटिंग, सिक्स-अ‍ॅक्शन पल्सेटर वॉश आणि एअर ड्राय फंक्शन आहे. थॉमसन वॉशिंग मशीनमध्ये डिजिटल कंट्रोल डिस्प्ले, 840 आरपीएम स्पिन आणि चाइल्ड लॉक यासह अनेक फिचर्स आहेत. ते क्विक वॉश आणि ट्यूब क्लीन सारख्या उपयुक्त फिचर्स देखील देतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -