भांड्याच्या दुकानात मध्यरात्री चोरट्यांनी चोरी केली. त्यामध्ये १ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत अशोक मुलचंद शहा (वय ५०) यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अशोक शहा यांचे स्टेशन रोडवरील दत्त मंदिराजवळ न्यु महाशक्ती मेटल मार्ट हे भांड्याचे
दुकान आहे. गुरुवारी (ता.९) रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. शुक्रवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी ते आले असता दुकानाचे शटर तोडलेले दिसले. आत पाहणी केली असता दुकानातील रोकड आणि मोठ्धा प्रमाणात पितळी व कास्याची भांडी गायब असल्याचे आढळले.
चोरट्याने शटरचे कुलूप कटरने कापून आत प्रवेश करत पितळी पंचआरती, हंड्या, अभिषेक पात्र, तांबे नक्षीचे भांडे, गौराई मुकुट, कास्याच्या वाट्या, पितळेची पातेली अशा विविध वस्तूंसह ९० हजार रुपये रोख असा मिळून १
लाख ७४ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घटनेनंतर शहा यांनी पोलिसांना याबाबत कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन
पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा लाल शर्ट परिधान करून भांड्याचे पोते हातात घेऊन दुकानातून बाहेर
पडताना दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.








