भंडारा जिल्ह्यातील लाखनी बसस्थानकावर चिल्लरसाठी महिला कंडक्टरने प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता की, महिला कंडक्टर प्रवाशाला सर्वासमोर मारहाण करत आहे. ती त्याच्या पाठीत आणि कानाखाली मारताना दिसत आहे. इतर प्रवासी हा राडा पाहत असल्याचे दिसत आहे.
या घटनेचा प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशाला चिल्लर साठी मारहाण करणाऱ्या महिला कंडाक्टरवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
भंडारा जिल्ह्यातील महिला कंडक्टर कडून मारहाणीची दुसरी घटना आहे. आठ दिवसाआधी एका महिला कंडक्टरने विद्यार्थिनीला केस ओढून मारहाण केल्याची घटना घडली होती.
आता पुन्हा अशीच घटना समोर आल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. मारहाण करणाऱ्या महिला कंडक्टरवर तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे
