Friday, October 17, 2025
Homeइचलकरंजीविठ्ठल बिरदेव यात्रेसाठी येणार्‍या वाहनाला हुपरीनजीक अपघात

विठ्ठल बिरदेव यात्रेसाठी येणार्‍या वाहनाला हुपरीनजीक अपघात

पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेनिमित्त देवदर्शनाला जात असताना हुपरीजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या भाविकांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मालवाहतूक करणार्‍या आयशर ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कर्नाटकातील 7 भाविक गंभीर जखमी झाले.

 

हा अपघात रविवारी रात्री उशिरा घडला. जखमींवर कोल्हापुरातील सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे. शिवाप्पा नसलापुरे (वय 60), गौराबाई सांडगे (70), लखाप्पा शिवाप्पा नसलापुरे (14), प्रवीण शिवाप्पा नसलापुरे (18), लताप्पा शिवाप्पा नसलापुरे (60), मानतेश लगमा नसलापुरे (14), सिदाप्पा विठ्ठल करोले (18, सर्व रा. नंदीकुरळी, ता. रायबाग, जि. बेळगाव) अशी जखमींची नावे आहेत. याची फिर्याद सिद्धाप्पा कलोरी यांनी हुपरी पोलिस ठाण्यात दिली आहे.

 

पट्टणकोडोली येथे रविवारपासून सुरू झालेल्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेनिमित्ताने देव दर्शनाला व फरांडेबाबांची भाकणूक ऐकण्यासाठी नंदीकुरळी येथील कांही भाविक ट्रॅक्टर-ट्रॉली (क्र. केए-24, टी -5578) मधून येत होते. हुपरी-पट्टणकोडोली रस्त्यावरील एका हॉटेल नजीकच्या रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टर ट्रॉली थांबली असताना मागून आलेल्या मालवाहतूक ट्रकने (क्र. एमएच-11 सीएच-8328) ने जोराची धडक दिली. यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये बसलेले सात भाविक गंभीर जखमी झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -