पैशाचे आमिष दाखवून पीडित महिलेला वड्डी (ता. मिरज) येथील एका शेतातील घरात नेऊन तिच्याशी तिघांनी वेळोवेळी शरीरसंबंध ठेवल्याने पीडित महिला गर्भवती राहिल्याने संशयित तिघांच्याविरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी : कुपवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेला डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत संशयिताने पैशाचे आमिष दाखवून मिरज तालुक्यातील एका गावातील एका शेतातील घरात नेऊन प्रत्येक वेळी वेगवेगळ्या दोन अनोळखी पुरुषांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. त्या दोन अनोळखी पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याने पीडित महिला गर्भवती राहिल्याचे उघडकीस आले. याबाबत पीडित महिलेने संशयित तिघांच्या विरोधात रविवारी कुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तिघांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. मिरजेचे पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा तपास करीत आहेत.