Friday, October 17, 2025
Homeमहाराष्ट्रशाळेच्या दिवाळी अन् उन्हाळी सुट्ट्या जाहीर….

शाळेच्या दिवाळी अन् उन्हाळी सुट्ट्या जाहीर….

दिवाळीचा(Diwali) सण हा भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. लहान मुलं या सणाची आतुरतेने वाट पाहतात. दिवाळीसाठी शाळेला सुट्ट्या दिल्या जातात. यंदा शाळेला दिवाळी सुट्टी किती दिवस असणार आहे आणि कधीपासून सुरु होणार याबद्दल शालेय विभागाने जाहीर केलं आहे. त्यासोबत उन्हाळी सु्ट्टीबद्दलही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत पालकांनो सुट्ट्यांच्या या तारखांची नोंद करुन घ्या.

 

सध्या शाळा आणि कॉलेजमध्ये दिवाळीपूर्वी सत्र परीक्षा सुरु आहे. तर 17 ऑक्टोबरपासून दिवाळीचा पहिला सण वसुबारसला सुरुवात होणार आहे. तर 22 ऑक्टोबरला भाऊबीज असणार आहे. अशात यंदा जिल्हा परिषदेसह महापालिका, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना 12 दिवस दिवाळी (Diwali)सुट्टी आहेत. या दिवाळी सुट्ट्या 16 ऑक्टोबरपासून 27 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. मंगळवार 28 ऑक्टोबरपासून पुन्हा शाळाची घंटा वाजणार आहे.

 

शैक्षणिक वर्षाच्या शेवटी 2 मे ते 13 जूनपर्यंत शाळांना उन्हाळा सुट्ट्या असणार आहे. त्यापूर्वी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्वितीय सत्र परीक्षा सुरू होतील, असं शालेय विभागाकडून सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने यामध्ये बदल करून सर्व शाळांची द्वितीय सत्र परीक्षा एकाचवेळी सुरू करण्याचे आदेश दिले. यामुळे शैक्षणिक वर्षात किमान 220 दिवस विद्यार्थ्यांचे अध्यापन सुनिश्चित होईल.

तर दिवाळीनंतर, नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान सोलापूरसह राज्यभरातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचे आयोजन दोन टप्प्यात होईल. यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता जास्त असल्यामुळे दोन्ही टप्प्यांमध्ये शिक्षकांना निवडणुकीसाठी काम करावे लागणार आहे, याबद्दलही शालेय विभागाने शाळांना पूर्वकल्पना दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -