Friday, October 17, 2025
Homeमहाराष्ट्रइलेक्ट्रीक कारला अचानक लागली आग, ड्रायव्हर जीवंत जळला, Video Viral

इलेक्ट्रीक कारला अचानक लागली आग, ड्रायव्हर जीवंत जळला, Video Viral

इलेक्ट्रीक कारची सध्या चलती आहे. त्यामुळे प्रदुषणातून सुटका आणि पेट्रोलचा खर्च वाचतो असे म्हटले जात आहे. मात्र इलेक्ट्रीक कारचा एक भयानक अपघात होऊन त्या कारच्या ड्रायव्हरला बाहेरच पडता न आल्याने तो जीवंत जळाल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक वाहनांच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला आहे.

 

Xiaomi कंपनीच्या इलेक्ट्रीक कारला अचानक आग लागल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या अपघातात जीवंत जळाल्याने ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. ही माहिती ‘फ्री प्रेस जर्नल’ने दिली आहे. हा भयानक अपघात चीनच्या चेंगडू शहरात झाला

 

Xiaomi SU7 कारला हा अपघात झाला आहे. ही कार आधी एका डिव्हायडर धडकली. त्यानंतर कारला अचानक आग लागली. त्यामुळे तांत्रिक बिघाडाने कारचे दरवाजे लॉक झाले. या कारचा चालक कारमधून त्यामुळे बाहेर येऊच शकला नसल्याने त्याचा जीवंत भाजून मृत्यू झाल्याचे म्हटले जाते.

 

प्रवाशांनी वाचवण्याचा प्रयत्न केला

व्हिडीओत पाहू शकता की काही प्रवाशांनी या कारचालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांना कारचे दरवाजे उघडता आले नाहीत. वास्तविक प्रवाशांनी कारच्या खिडक्या तोडण्याचा प्रयत्न केला. कारचा दरवाजा लॉक झाल्याने या प्रवाशांचे प्राण वाचवता आले नसल्याचे उघड झाले आहे.

 

भारतात देखील ही कार शोकेश झाली आहे

Xiaomi चीनी मोबाईल मॅन्युफॅक्चरनी काही वर्षांपूर्वी आपली ही इलेक्ट्रीक कार बाजारात आणली होती आणि चीनमध्ये या कारची विक्रीही सुरु झाली आहे. गेल्यावर्षी Xiaomi कंपनीने बंगळुरु येथे आयोजित एका मोबाईल ईव्हेंट दरम्यान Xiaomi SU7 कारला प्रदर्शितही केले होते. परंतू भारतात या कारला लाँच करण्यात आलेले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -