Friday, October 17, 2025
Homeमहाराष्ट्र15 जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट; परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा भरली...

15 जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट; परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा भरली धडकी

दिवाळी अगदी चार दिवसांवर येऊन ठेपलेली असताना परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना (Maharashtra Rains Updates) पुन्हा एकदा धडकी भरलीय. हवामान विभागानं आज (16 ऑक्टोबर) आणि उद्या (17 ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगर, जळगाव, पुणे, सातारा, अहिल्यानगरसह 15 जिल्ह्यांना यलो अलर्टचा (Yellow Alert) इशारा दिलाय आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं शेतकऱ्यांचं (Marathwada Farmer) अतोनात नुकसान झालं. काही शेतकऱ्यांच्या जमीनी वाहून गेल्यात तर काही शेतकऱ्यांचं हाता तोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालं, त्यातून बळीराजा सावरत नाहीत तेवढ्यात हवामान विभागानं पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिल्यानं, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

 

यवतमाळच्या जिल्ह्यातील पुसद परिसरात पावसाने हजेरी लावली असून पावसामुळे (Rain In Yavatmal) पुसद आणि वनवारला परिसरात शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतकरी सोयाबीनची कापणी आणि काढणी सुरू असतानाच सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सोयाबीन भिजत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची गंजी झाकण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अतिवृष्टीमुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला असल्याने कसेबसे वाचलेले सोयाबीन काढतेवेळी पाऊस आल्याने शेतात उभे असलेले सोयाबीन पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच शेतात फुटलेला कापूसही ओला झाल्याने शेतकऱ्यांनाचे नुकसान होत आहे.

 

पाण्यावरच्या शेतीचा धाराशिव पॅटर्न तयार करण्यासाठी चाचपणी- (Experiments to create a Dharashiv pattern of water-based farming)

महापुरात धाराशिवमध्ये शेकडो एकर जमीन खरडून गेली. नदीकाठच्या जमिनीला याचा सर्वाधिक फटका बसला. शेतात मातीच शिल्लक नाही. त्यामुळे आता अशा ठिकाणी पाण्यावर शेती करता येईल का याची चाचपणी केली जात आहे. पाण्यावरच्या शेतीचा धाराशिव पॅटर्न तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. महिनाभरात याबाबतचा अहवाल तयार करण्याचे सांगण्यात आलं आहे. पाण्यावरची शेती खर्चिक आहे मात्र त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली जाणार असल्यास सरनाईक म्हणाले.

 

काढणीला आलेलं सोयाबीन काढा, कृषी विद्यापीठाचा सल्ला (Rain Updates)

दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांना काही शिफारसी केल्या आहेत. त्यानुसार, काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकची काढणी लवकरात लवकर करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी. तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -