सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसेस (RITES) लिमिटेडने भरती जाहीर केली आहे.
कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
या भरतीद्वारे एकूण ६०० रिक्त पदे भरली जाणार असून या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०२५ आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट rites.com ला भेट देऊन अंतिम मुदतीपूर्वी पदांसाठी अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता :
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल, इलेक्ट्रिकल मॅकेनिकल किंवा इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा प्राप्त केलेला असावी.केमिस्ट्रीमध्ये बीएससी पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत विविध पदांसाठी पात्रतादेखील वेगवेगळी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हा पात्रता पाहा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय ४० वर्ष असावे.
अर्ज शुल्क : अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या श्रेणीनुसार विहित अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे लागेल, त्यानंतरच त्यांचा अर्ज स्वीकारला जाईल. हे शुल्क खालीलप्रमाणे आहे:
सामान्य/ओबीसी – ₹३००
ईडब्ल्यूएस/एससी/एसटी/पीडब्ल्यूडी – ₹१००
पगार: निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ₹१६,३३८ ते ₹२९,७३५ पगार मिळेल.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. तुम्हाला १२५ प्रश्न विचारले जातील. यामध्ये मिळणाऱ्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी rites.com वर जा.
यानंतर होमपेजवरील करिअर सेक्शनवर जा.
यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे.
यानंतर काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहे. यानंतर फर्म सबमिट करुन प्रिंट आउट काढा.