शेअर मार्केट मधील अस्थिरता आणि बँकांच्या FD योजनांमधून मिळणारा कमी परतावा यामुळे गुंतवणूकदार अडचणीत सापडले आहेत. कुठे गुंतवणूक करावी हे सुचत नाही. दरम्यान जर तुम्हीही अशाच द्विधा अवस्थेत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका स्मॉल सेविंग स्कीम बाबत माहिती सांगणार आहोत ज्यात तुम्हाला चांगले व्याज मिळणार आहेत.
या योजनेचे सर्वात मोठी विशेषता म्हणजे तुम्हाला दर महिन्याला एक निश्चित रक्कम मिळणार आहे. या योजनेत तुम्ही एकदा पैसा गुंतवला की तुम्हाला दर महिन्याला निश्चित व्याज मिळत राहणार आहे यामुळे तुमच्या महिन्याच्या खर्चाची चिंता मिटेल. पोस्ट ऑफिसकडून वेगवेगळ्या प्रकारच्या बचत योजना चालवल्या जातात.
किसान विकास पत्र, सीनियर सिटीजन सेविंग स्कीम अशा अनेक योजना आहेत ज्या आपल्या गुंतवणूकदारांना चांगले व्याज देतात. मंथली इनकम स्कीम देखील अशीच एक योजना आहे. MIS योजनेत तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत गुंतवणूक करू शकता.
या योजनेत तुम्हाला सिंगल अकाउंट आणि जॉइंट अकाउंट ओपन करण्याचा ऑप्शन मिळतो. तुम्ही तुमच्या बायको समवेत या योजनेत जास्तीत जास्त पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. तसेच सिंगल अकाउंट ओपन करून गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त नऊ लाख रुपये गुंतवता येतात.
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सद्यस्थितीला 7.40% दराने व्याज दिले जात आहे. दरम्यान आता आपण तुम्ही तुमच्या पत्नीसमवेत या योजनेत गुंतवणूक करून कशा पद्धतीने 6167 रुपये महिना व्याज मिळवू शकता याबाबत माहिती पाहणार आहोत.
मिळणार जबरदस्त रिटर्न
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना सध्या वार्षिक 7.4 टक्के व्याजदर देते. यात तुम्ही किमान 1 हजार रुपयांची गुंतवणूक करून खाते ओपन करू शकता. MIS योजनेअंतर्गत, तुम्ही सिंगल अकाउंट ओपन करून नऊ लाखांची तर जॉइंट अकाउंट ओपन करून 15 लाखांची संयुक्त गुंतवणूक करू शकता.
या योजनेच्या संयुक्त खात्यात जास्तीत जास्त तीन लोकांना सहभागी होता येते. तुम्ही तुमच्या पत्नीसह या योजनेत 10 लाख गुंतवले तर तुम्ही केवळ व्याजातून मासिक उत्पन्न मोठी रक्कम कमावू शकता. ही योजना पाच वर्षांची आहे. यामध्ये जर तुम्ही दहा लाखांची गुंतवणूक केली तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 6167 रुपयांचे व्याज मिळणार आहे.
अर्थात पाच वर्षांच्या काळात तुम्हाला तीन लाख 70 हजार वीस रुपये व्याज मिळेल. योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला गुंतवलेली रक्कम सुद्धा परत मिळणार आहे. नक्कीच या दिवाळीत तुम्हाला एखाद्या सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी पोस्टाची मासिक उत्पन्न योजना फायद्याची ठरणार आहे.