Friday, October 17, 2025
Homeमहाराष्ट्रजग हादरलं! अमेरिकेचा मोठा हल्ला, तणाव वाढला, थेट उडवले अख्ये.

जग हादरलं! अमेरिकेचा मोठा हल्ला, तणाव वाढला, थेट उडवले अख्ये.

अमेरिकन लष्कराने कॅरिबियन समुद्रात मोठी कारवाई केली. एका संशयित ड्रग्ज तस्करी जहाजावर थेट हल्ला केला. यामुळे परिस्थिती अधिकच चिघळताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिकन लष्कर कॅरिबियन समुद्रात कारवाई करत असून संशयित जहाजांना टार्गेट करत थेट जहाज उडवले जाते.

 

एका अमेरिकन अधिकाऱ्याने बोलताना म्हटले की, ही आमची पहिली कारवाई आहे की, हल्ल्यानंतरही जहाजावरील काही लोक जिवंत आहेत. तत्सम अमेरिका आणि वेनेज़ुएला यांच्यातील संबंध यामुळे तणावपूर्ण आहेत. थेट अमेरिका जहाज उडून देत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अवैध राष्ट्रपती थेट म्हटले.

 

अमेरिकेचा जहाजावर अत्यंत मोठा हल्ला

 

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या की ट्रम्प यांच्या मते, मादुरो एक बेकायदेशीर राजवट चालवत आहेत. अमेरिकेच्या हल्ल्याबद्दलची माहिती मर्यादित आहे. जास्त याबद्दल माहिती देता येणार नाही. हल्ल्यानंतर अमेरिकन सैन्याने वाचलेल्यांना मदत केली आणि त्यांना ताब्यात घेतले आहे. हा पहिला हल्ला आहे की, ज्यामुळे काही लोक वाचली आहेत. मेरिकेचा शेजारी देशांसोबत तणाव वाढताना दिसत आहे. यापूर्वी, अमेरिकेने व्हेनेझुएलाजवळ संशयित ड्रग्ज बोटींवर केलेल्या हल्ल्यात 27 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला.

 

अमेरिकन सैन्याने कॅरिबियन प्रदेशात वाढवली ताकद

 

ट्रम्प प्रशासनाने म्हटले की, अमेरिका आधीच व्हेनेझुएलाच्या ड्रग्ज-दहशतवादी गटांविरुद्धच्या युद्धात सहभागी आहे. या हल्ल्यांदरम्यान, अमेरिकन सैन्याने कॅरिबियन प्रदेशात आपल्या लष्कराची ताकद वाढवली आहे. ट्रम्प म्हणाले की, त्यांनी सीआयएला व्हेनेझुएलामध्ये गुप्त कारवाया करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार, कारवाया या सुरू आहेत.

 

अमेरिकन लष्करी वर्तुळात मोठी खळबळ

 

गेल्या आठवड्यात, पेंटागॉनने जाहीर केले की, कॅरिबियन प्रदेशातील अमेरिकेच्या अंमली पदार्थ विरोधी कारवाया आता दक्षिणी कमांड ऐवजी एका नवीन टास्क फोर्सकडून चालवल्या जातील. त्यानुसार कारवाई सुरू आहे. टास्क फोर्स उत्तर कॅरोलिना येथील कॅम्प लेज्यून येथे असलेल्या मरीन एक्सपिडिशनरी फोर्सद्वारे चालवले जाईल, हा बदल अमेरिकन लष्करी वर्तुळात धक्कादायक मानला जात आहे. यासोबतच ट्रम्प हे सातत्याने गंभीर आरोप करताना दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -