आता तेलंगणामध्ये आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, मागास वर्गासाठी 42 टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी तेलंगणामध्ये राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. मागास वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध संस्था आणि प्रमुख राजकीय पक्षांकडून या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. तेलंगणामध्ये पुकारण्यात आलेल्या या बंदचा मोठा परिणाम हा तेथील शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर झाला. सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. मागास जाती संयुक्त कारवाई समितीच्या वतीनं हा बंद पुकारण्यात आला होता, या बंदला सत्ताधारी काँग्रेससह, विरोधी पक्ष भारत राष्ट्र समिती आणि भाजपाचा पाठिंबा मिळाला. या बंद काळात आंदोलकांकडून हैदराबाद शहरासह अनेक प्रमुख शहरांमधील दुकानं आणि पेट्रोल पंपांवर हल्ला करण्यात आला, मोठ्या प्रमाणात तोडफोड देखील करण्यात आली, या घटनेत मोठं नुकसान झालं आहे.
तेलंगणामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यव्यापी बंद पुकारण्यात आल्यानं याचा सर्वाधिक फटका हा राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसला, आज तेलंगणा राज्य परिवहन विभागाच्या बस डेपोमधून बाहेरच निघाल्या नाहीत, त्यामुळे दिवाळीसाठी आपल्या गावी निघालेल्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. प्रवाशांची बस स्टँडवर मोठी गर्दी पहायला मिळाली, तसेच बंद असल्यामुळे राज्यातील अनेक शाळा, कॉलेज, दुकानं बंद ठेवण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा सोडून सर्व सेवा बंद ठेवाव्यात असं आवाहन यावेळी आयोजकांकडून करण्यात आलं होतं.
हायकोर्टने या संदर्भात 9 ऑक्टोबर रोजी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे, ज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागास जातींसाठी 42 टक्के आरक्षणाच्या सरकारच्या निर्णयाला रद्द करण्यात आलं आहे, त्यानंतर तेलंगणामध्ये या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मागास जाती संयुक्त कारवाई समितीच्या वतीनं बंदची हाक देण्यात आली होती, या बंदला विविध राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दिला आहे. या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत, पेट्रोल पंप आणि दुकानांमध्ये तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे.