Saturday, October 18, 2025
Homeक्रीडारोहित शर्माची ऑस्ट्रेलियात एक दोन नाही तर आठ विक्रमांवर नजर, काय ते...

रोहित शर्माची ऑस्ट्रेलियात एक दोन नाही तर आठ विक्रमांवर नजर, काय ते जाणून घ्या

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्माचं कर्णधारपद गेलं असलं तरी त्याची तयारी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याच्याकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. रोहित शर्माच्या रडारवर या दौऱ्यात आठ विक्रम आहेत.रोहित शर्मा आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 46 वनडे सामने खेळला आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 88 षटकार मारले आहे. वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध षटकारांचं शतक ठोकण्यासाठी 12 षटकारांची आवश्यकता आहे. त्यामुळे तीन वनडे सामन्यात ही कामगिरी करतो का? याकडे लक्ष आहे.

 

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 49 अर्धशतकं झळकावली आहेत. त्याला अर्धशतकांचं अर्धशतक करण्यासाठी एका अर्धशतकाची गरज आहे. रोहित शर्माने कसोटीत , वनडे सामन्यात आणि टी20 सामन्यात 5 अर्धशतकं ठोकली आहेत.

 

रोहित शर्माचा टीम इंडियासाठी खेळताना 500वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. यासह 500 सामने खेळणारा पाचवा खेळाडू ठरेल. या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. त्याने 664 सामने खेळले आहे. विराटने 550, धोनीने 535 आणि राहुल द्रविडने 504 सामने खेळले आहेत.

 

रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमापासून फक्त 8 षटकार दूर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला हा विक्रम गाठण्याची संधी आहे. शाहीद आफ्रिदीच्या नावावर 351 षटकार असून पहिल्या स्थानावर आहे. रोहित शर्माच्या नावावर 344 षटकार आहेतरोहित शर्माने या वनडे मालिकेत 196 धावा केल्या तर वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरेल. सचिन तेंडुलकर या यादीत पहिल्या स्थानावर असून त्याने 18426 धावा केल्यात. तर विराटने 14181 धावा, सौरव गांगुलीने 11221 धावा केल्यात. रोहित शर्माने 11168 धावा केल्यात

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -