Sunday, October 26, 2025
Homeमहाराष्ट्रआनंदाची बातमी ! गिरणी कामगारांसाठी अडीचशे घरे तयार

आनंदाची बातमी ! गिरणी कामगारांसाठी अडीचशे घरे तयार

मुंबईतच घरे देण्याची मागणी हजारो गिरणी कामगारांनी लावून घरलेली असताना त्यापैकी साधारण अडीचशे गिरणी कामगारांचे मुंबईतील घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. बॉम्बे डायिंग येथे १६० तर न्यू ईस्टर्न मिल येथे ९६ घरे बांधली जात आहेत.

 

त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.

 

मुंबईतील बंद पडलेल्या कापड गिरण्यांच्या जागेवर घरे बांधून ती गिरणी कामगारांना द्यावीत, अशी मागणी गेली कित्येक वर्षे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांकडून केली जात आहे. ही मागणी मान्य करून २०१२ साली पहिली सोडत गिरणी कामगारांसाठी काढण्यात आली. स्वान, अपोलो, एलफिन्स्टन, कोहिनूर, स्वदेशी, मुंबई, पिरामल, गोकुळदास या अंतर्गत एकूण १८ गिरण्यांच्या जागेवर तेथील कामगारांना घरे देण्यात आली. या सोडतीत ६ हजार ९२५ घरांचा समावेश होता. अनेक सोडतींनंतरही हजारो गिरणी कामगार घराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना शेलू आणि वांगणी येथील घरांचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र त्यांना तो पर्याय मान्य नाही. बॉम्बे डाईंग येथे १६० तर न्यू ईस्टर्न मिल येथे ९६ घरे बांधली जात आहेत. त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. बॉम्बे डायिंग येथे ८० संक्रमण गाळेही बांधण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -