टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत करत 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकाही आपल्या नावावर केली. उभयसंघातील दुसरा सामना हा एडलेड ओव्हलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला नाणेफेक जिंकून फलंदाजाीसाठी भाग पाडलं. भारताने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 264 धावा केल्या. भारताने अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 46.2 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने मिचले मार्श याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा शनिवारी 25 ऑक्टोबरला होणार आहे.
ऑस्ट्रेलियाने भारताला 2 विकेट राखून लोळवलं, मालिका घातली खिशात
ऑस्ट्रेलियाने भारताला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पराभूत केलं. या सामन्यात भारताने विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 2 गडी राखून जिंकलं. खरं तर शेवटच्या टप्प्यात या सामन्यात रंगत वाढली होती. पण हा सामना भारताच्या हातून निसटला होता. कॉनोलीने भारताच्या विजयाच्या आशेवर पाणी टाकलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने जिंकली आहे. त्यामुळे तिसरा सामना औपचारिक असणार आहे.






