Saturday, October 25, 2025
Homeइचलकरंजीदोन ठिकाणी जुगार अड्डयांवर छापे ; १३ जण ताब्यात

दोन ठिकाणी जुगार अड्डयांवर छापे ; १३ जण ताब्यात

शिवाजीनगर पोलिसांनी भोनेमाळ आणि शेळके मळा जॅकवेल रोड याठिकाणच्या जुगार अड्ड्यावर छापे मारले. या कारवाईत ६ दुचाकी, ९ मोबाईल व जुगाराचे साहित्य असा ३ लाख २२ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर १३ जणांना ताब्यात घेतले आहे.

 

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, भोनेमाळ परिसरातील खंडेलवाल इमारतीच्या पहिल्या मजल्यावर तीनपानी जुगार सुरु असल्याची माहिती + मिळाल्यावरुन शिवाजीनगर पोलिसांनी

 

त्याठिकाणी छापा मारला. त्यावेळी तौसिफ रशिद मुल्ला (वय ३६ रा. गोकुळ चेंकि), अतुल चंद्रकांत पेटकर (वय २९), संकेत उमेश म्हात्रे (वय २९ दोघे रा. भोनेमाळ), केतन किरण घोरपडे (वय ३० रा. पाटील मळा) व वरुण जगदीश जगवाणी (वय २६ रा. यशवंत कॉलनी) हे पाचजण तीनपानी जुगार खेळताना मिळून आले. त्याचबरोबर जुगार अड्डा चालविणारा प्रकाश रविंद्र हुंडेकरी आणि इमारत मालक खंडेलवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ४ मोबाईल, रोकड, डिव्हीआर, जुगाराचे साहित्य असा १ लाख ७२ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

 

आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सद्दाम गजबर सनदी यांनी फिर्याद दिली आहे.

 

तर शेळके मळा जॅकवेल रोड परिसरातील एका खोलीत सुरु असलेल्या जुगार अड्कुधावर पोलिसांनी छापा मारला असता तेथे अड्डाचालक विश्वनाथ विलास लवटे (वय ४१ रा. लिगाडे मळा), अक्षय पाटील (रा. चंदूर), कबीर खुदबुद्दीन मोमीन (रा. भोने माळ), शरद किशोर पाटील (रा. कबनूर) व संतोष हात्रे (रा. कोरोची) हे जुगार खेळताना मिळून आले.

 

या कारवाईत ५ मोबाईल, ६ दुचाकी, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा १ लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल पवन दिलीप गुरव यांनी फिर्याद दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -